जळगावात ३३ दिवसात तब्बल २८ ठिकाणी घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:11 PM2019-07-09T12:11:09+5:302019-07-09T12:15:28+5:30

पोलिसांना आव्हान : एकही गुन्हा उघड नाही

33 days in Jalgaon, 28 round house houses | जळगावात ३३ दिवसात तब्बल २८ ठिकाणी घरफोड्या

जळगावात ३३ दिवसात तब्बल २८ ठिकाणी घरफोड्या

Next

सुनील पाटील

जळगाव : शहरात गेल्या काही दिवसापासून मालमत्ता व शरीराविरुध्दच्या गुन्ह्यांमध्ये कमालीची वाढ झालेली आहे. ३ जून ते ६ जुलै या ३३ दिवसात शहरात चोरी व घरफोडीच्या तब्बल २८ घटना घडल्या आहेत. या घटनांची पोलिसात नोंद आहे, प्रत्यक्षात नोंद नसलेल्या घटना आणखी वेगळ्या आहेत. दिवसागणिक गुन्हे घडत आहेत. पोलिसांची रात्र व दिवसाची गस्त कागदोपत्रीच असल्याचे दिसून येत आहे.
जून महिन्यातच सर्वाधिक चोरी व घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. त्याशिवाय खून, दरोडा व प्राणघातक हल्ला यासारख्या घटनांनीही जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण केला. निंबोल, ता.रावेर येथील विजया बॅँकेवरील दिवसाढवळ्या दरोड्याचा प्रयत्न आणि सहाय्यक व्यवस्थापकाची गोळी झाडून झालेली हत्या असो कि मू.जे.महाविद्यालयात विद्यार्थ्याचा भरदिवसा झालेला खून या दोन्ही घटनांनी तर संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या दोन्ही घटना पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने घेतल्या, त्यात मू.जे.महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या खूनाची घटना उघडकीस आणण्यात त्यांना यश आले. निंबोलच्या घटनेच्या तपासासाठी अजूनही दीडशेच्यावर अधिकारी व कर्मचारी गुंतले आहेत. त्यात रविवारी बोदवडच्या जंगलात तृतियपंथीचा ख्ून झाला. पोलीस यंंत्रणा अन्य तपासात गुंतल्याची संधी म्हणा किंवा ढेपाळलेली गस्त यामुळेच चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
बसस्थानकात चोऱ्यांचे प्रमाण वाढले
नवीन बसस्थानकात चोºया व पाकीटमारीच्या घटना वाढल्या आहेत. जून महिन्यात दोन महिलांचे दागिने लांबविण्यात आल्यानंतर एक शेतकºयाचे ५० हजार तर दुसºया शेतकºयाचे दहा हजार रुपये लांबविण्यात आले. एकेका दिवशी दोन व तीन घटना घडल्या आहेत. शनिवारीदेखील एकाचा मोबाईल तर दुसºयाचे पाकीट लांबविण्यात आले. घरफोड्यांचेही तसेच आहे. तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच दिवशी पाच घरफोड्या झाल्या होत्या.
अधिकाऱ्यांचे नियंत्रणच नाही
प्रभारी अधिकाºयांचे आपल्या कर्मचाºयांवर नियंत्रणच नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काम करणारे कर्मचारी कामच करीत असतात तर अधिकाºयाच्या मागेपुढे फिरणारे त्यांची खासगी व घरगुती कामे करीत असतात, त्यामुळे त्यांच्या कामाचा ताण इतर कर्मचाºयांवर पडत आहे. सहायक पोलीस अधीक्षकांनी अनेक प्रभारी अधिकाºयांना अवैध धंद्याबाबत नोटीसा बजावल्या आहेत, मात्र तरी देखील त्यात सुधारणा झालेली नाही.

Web Title: 33 days in Jalgaon, 28 round house houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव