१४ हजार दिव्यांग मतदारांना विशेष दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:01 PM2019-03-24T12:01:59+5:302019-03-24T12:02:15+5:30

- विभागीय आयुक्त राजाराम माने

14 thousand Divyan voters have special status | १४ हजार दिव्यांग मतदारांना विशेष दर्जा

१४ हजार दिव्यांग मतदारांना विशेष दर्जा

Next
ठळक मुद्देनेण्या आणण्याच्या व्यवस्थेचे आदेश


जळगाव : जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विशेष दर्जा देण्यात आला असून १४ हजार १६३ मतदारांना नेण्या-आणण्याची व्यवस्था व निवासाची व्यवस्था करण्याचे आदेश विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी शनिवारी येथे आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी घेतला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अपर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर, सहाय्यक आयुक्त (प्रशासन) उन्मेष महाजन आदी उपस्थित होते.
‘पूर्वपीठिका’ चे प्रकाशन
जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या लोकसभा निवडणूक पूर्वपीठीका-२०१९ चे प्रकाशन राजाराम माने यांच्या हस्ते शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्यासह अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.
नवमतदारांची घेतली माहिती
माने यांनी जिल्ह्यात नवमतदार वाढण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली.
३१२ शस्त्रे केली जमा
जिल्ह्यात चोपडा तालुक्यात्त पाच तर रावेर तालुक्यात सहा मतदान केंद्रावर मोबाईल नेटवर्क नसल्याने त्याठिकाणी पोलीस वॉकीटॉकीचा वापर करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्णात ५५५ व्यक्तींकडून त्यांची शस्त्रे जमा करण्यात येणार असून आतापर्यंत ३१२ शस्त्र जमा झाली असून उर्वरित शस्त्रे लवकरात लवकर जमा करण्याची कार्यवाही सुरु असून ईव्हीएम स्ट्राँग रुम सिलींग व सेटींगच्या कार्यवाहीबाबतची माहिती देण्यात आली.
दिव्यांग मतदारांना विशेष दर्जा
भारत निवडणूक आयोगाने या निवडणूकीपासून दिव्यांग मतदारांना विशेष दर्जा दिला आहे. जळगाव जिल्ह्यात १४ हजार १६३ दिव्यांग मतदार आहेत. त्यामुळे मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढला पाहिजे. यासाठी कोणत्या मतदान केंद्रावर कोणत्या प्रकारचे दिव्यांग असलेल्या किती व्यक्ती आहे. याची सविस्तर माहिती संबंधितांनी तयार करुन ठेवावी. त्यानुसार त्यांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी वाहन व्यवस्था करणे, त्यांना सहाय्यकाची आवश्यकता भासणार असल्यास तशी माहिती संकलीत करणे, त्यांना मतदान केंद्रावर रॅम्प, पिण्याचे पाणी, मदत कक्ष निर्माण करणे, एकाच मतदान केद्रावर अधिका दिव्यांग व्यक्ती असल्यास त्यांना आणण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था करणे, त्यांचेसाठी मतदान केंद्रावर निवासाची व्यवस्था करण्याच्याही सूचना दिल्या.

Web Title: 14 thousand Divyan voters have special status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.