‘घाणेवाडी’च्या पाणीपातळीत अर्ध्या फुटाने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:49 AM2018-07-12T00:49:10+5:302018-07-12T00:49:37+5:30

नवीन जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयाच्या पाणीपातळीत महिन्याभरात केवळ अर्ध्या फुटाने वाढ झाली आहे.

The water level of 'Ghanewadi' increased by half a foot | ‘घाणेवाडी’च्या पाणीपातळीत अर्ध्या फुटाने वाढ

‘घाणेवाडी’च्या पाणीपातळीत अर्ध्या फुटाने वाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नवीन जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयाच्या पाणीपातळीत महिन्याभरात केवळ अर्ध्या फुटाने वाढ झाली आहे.
निजामकालीन बांधलेल्या या तलावात १६ फूट पाणी साठवण्याची क्षमता आहे. असे असतानाच महिन्याभरात या तलावाची पाणीपातळी ही केवळ अर्ध्या फुटाने वाढल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली. गेल्यावर्षी याच कालावधीत या तलावात साधारणपणे १३ फूट पाणी होते असे सांगण्यात आले. राजूर, केदारखेड, निधोना, तांदूळवाडी, पीरपिंपळगाव परिसरात जोरदार पाऊस झाल्यावर या घाणेवाडी तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याचे सांगण्यात आले. यंदा हा तलाव पूर्णपणे न आटल्याने यातून गाळाचा उपसा करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले.

Web Title: The water level of 'Ghanewadi' increased by half a foot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.