भाजीपाल्याचे भाव गडगडले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:57 AM2018-08-20T00:57:37+5:302018-08-20T00:58:04+5:30

पावसाने जोरदार हजेरी लावताच भाजी पाल्याचे भाव चांगलेच गडगडले आहेत, कांद्याचे भावही कोसळल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

Vegetable prices fall ... | भाजीपाल्याचे भाव गडगडले...

भाजीपाल्याचे भाव गडगडले...

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर: पावसाने जोरदार हजेरी लावताच भाजी पाल्याचे भाव चांगलेच गडगडले आहेत, कांद्याचे भावही कोसळल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.
परतूर तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. बहरलेल्या सर्वच पिकांना जीवदान मिळाले, बºयाच दिवसापासून आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी आता अंतर्गत मशागतीच्या कामाला लागला आहे. मागील दोन महिन्यापासून भाजी पाल्याला चांगला भाव मिळत होता. मात्र या आठवड्यात भाजी -पाल्याचे भाव चांगलेच गडगडले आहेत, नफा तर सोडाच लागवड, काढणी, वाहतुकीचाही खर्च यातून निघेनासा झाला आहे. कांद्यांचे भाव देखील मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. चांगला कांदा १० रूपये किलोने विक्री होत आहे, तर मिरचीच्या दरातही मोठी घसरण झाल्याने भाजीपाला व्यावसायिक हतबल झाले आहेत.

Web Title: Vegetable prices fall ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.