रस्त्यावरून बोरगावात तुंबळ हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:54 AM2018-04-30T00:54:30+5:302018-04-30T00:54:30+5:30

जाफराबाद तालुक्यातील बोरगाव फदाट येथे शेतवस्ती रस्त्यावरून दोन गटात हाणामारी होऊन या मध्ये पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत ठोबरे,पोहेका भगत राजपूत, डी.आर काहळे, संगीता अशोक फदाट हे जखमी झाले

Thunderstorms in Borgaon | रस्त्यावरून बोरगावात तुंबळ हाणामारी

रस्त्यावरून बोरगावात तुंबळ हाणामारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील बोरगाव फदाट येथे शेतवस्ती रस्त्यावरून दोन गटात हाणामारी होऊन या मध्ये पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत ठोबरे,पोहेका भगत राजपूत, डी.आर काहळे, संगीता अशोक फदाट हे जखमी झाले आहे. जखमी पोलिसांना जालना सामान्य रुग्णालयात उपचारा साठी दखल करण्यात आले.
गावा पासून शेतवस्तीकडे जाणार रस्त्याविषयी शेतमालक व काही ग्रामस्त यांच्यात वाद होऊन या रस्त्याचे प्रकरण न्यायालयात गेले आहे. तरी देखील रविवारी सकाळी रस्त्याचे काम सुरू करण्यात येऊन नियमानुसार काम करण्या करता शेतमालक यांनी सुरुवात केली असता त्यांना मारहाण करण्यात आली. व जखमी करण्यात आले. रस्त्याचे काम थांबवत नाही म्हणून नंदाबाई प्रकाश फदाट यांनी विष प्रशासन केले आहे. त्यांना सुद्धा जालना येथील सामान्य रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले आहे. झालेल्या मारहाण प्रकरणी जाफराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्या साठी फदाट कुटूंब गेले असता रात्री उशिरा पर्यंत पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर वसावे यांनी सांगितले की, पोलीस कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीविषयी जवाब येताच फिर्यादीची तक्रार दाखल करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
रविवारी रस्त्याच्या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद महिलेने विष प्राशन केल्याने विकोपला पोहोचला. भांडण सोडवण्यास गेलेल्या पोलिसांवरही हल्ला करण्यात आल्याने वाातावरण संतप्त झाले होते, पोलीसांनी संयम दाखवत तेथे बळाचा वापर केला नाही. दोन गटातील या वादाचे पडसाद संपूर्ण गावावर पडले. रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटांचे समर्थक आपापसात चर्चा करताना दिसून आले.

Web Title: Thunderstorms in Borgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.