बोगस बियाणे विक्रे त्यांना धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:56 AM2018-04-10T00:56:10+5:302018-04-10T10:44:12+5:30

येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे यासाठी शासनस्तरावर व्यापक नियोजन केले जात आहे. शेतक-यांना बोगस बियाणांची विक्री करणा-या विक्रेत्यांसह उत्पादक कंपनीवर थेट कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले

Teach a lesson to Bogus seed sellers | बोगस बियाणे विक्रे त्यांना धडा शिकवा

बोगस बियाणे विक्रे त्यांना धडा शिकवा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे यासाठी शासनस्तरावर व्यापक नियोजन केले जात आहे. शेतक-यांना बोगस बियाणांची विक्री करणा-या विक्रेत्यांसह उत्पादक कंपनीवर थेट कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात सोमवारी आयोजित खरीप हंगाम २०१८ च्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीष टोपे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांची बैठकीस प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, पीककर्ज वाटपात गतवर्षी बँकांनी चांगले काम केले आहे. पीकविमा योजनेमध्ये जिल्हा देशात प्रथम आला. शेतक-यांना कर्ज वाटप करत असताना दलालांचा हस्तक्षेप होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.
पात्र व गरजू शेतक-याला पीककर्ज मिळावे व दलालांचा कुठलाही हस्तक्षेप यामध्ये होऊ नये यासाठी बँकांनी प्रत्येक शाखेमध्ये सीसीटीव्ही बसवावेत. महसूल, कृषी विभागाच्या अधिका-यांनी वेळोवेळी बँकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन तपासणी करून दलालांना चाप लावावा. बँकांनी उद्दिष्टानुसार शेतक-यांना पीक कर्जाचे वाटप करावे. या कामात टाळाटाळ करणा-या बँकेविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशाराही लोणीकर यांनी दिला. येत्या खरीप हंगाता कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी गाव पातळीवर आतापासून जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या विविध योजनांबरोबच उन्हाळ्यातील पाणीटंचाई निवारणार्थ राबविण्यात येत असलेल्या उपाय योजनांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी उपयुक्त सूचना मांडल्या तर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी खरीप हंगामाच्या नियोजनाची माहिती दिली. प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांनी पॉवर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून खरीप हंगामाची माहिती दिली. या बैठकीस कृषी विभागातील अधिकारी, विविध बँकांचे प्रतिनिधींची उपस्थिती होती.
राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, शेतक-यांवर सातत्याने अनेक संकटे येत आहेत. खरीप हंगामामध्ये शेतक-यांना खते, बी-बियाणे, पतपुरवठा, मुबलक वीज मिळवणे आवश्यक असून, त्यासाठी योग्य नियोजन करावे. शासकीय योजनांबाबत ग्रामीण भागात व्यापक जनजागृती करण्यात यावी. नुकत्याच झालेल्या गारपिटीमध्ये शेडनेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतक-यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव शासनास पाठविण्याचे निर्देश खोतकर यांनी यावेळी दिले.

Web Title: Teach a lesson to Bogus seed sellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.