चांदी ८१ हजारांच्या पुढे, सोनेही वधारुन ७१,२५०वर; चांदीच्या भावात ६०० रुपयांची वाढ

By विजय.सैतवाल | Published: April 7, 2024 10:07 PM2024-04-07T22:07:20+5:302024-04-07T22:07:46+5:30

सोने-चांदीच्या भावात गेल्या महिन्यापासून मोठी वाढ सुरू झाली. ही वाढ रविवारीदेखील कायम राहिली.

Silver next to 81 thousand, gold also increased to 71,250; | चांदी ८१ हजारांच्या पुढे, सोनेही वधारुन ७१,२५०वर; चांदीच्या भावात ६०० रुपयांची वाढ

चांदी ८१ हजारांच्या पुढे, सोनेही वधारुन ७१,२५०वर; चांदीच्या भावात ६०० रुपयांची वाढ

जळगाव : सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच असून रविवार, ७ एप्रिल रोजी सोने १५० रुपयांनी वधारून ७१ हजार २५० रुपये प्रति तोळा झाले. तसेच चांदीच्या भावात ६०० रुपयांची वाढ होऊन ती ८१ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली.

सोने-चांदीच्या भावात गेल्या महिन्यापासून मोठी वाढ सुरू झाली. ही वाढ रविवारीदेखील कायम राहिली. तसे पाहता रविवारी बाजारपेठेत फारशी उलाढाल नसते, त्यामुळे सोने-चांदीचे भाव स्थिर असतात. मात्र भाववाढीच्या सत्रात आता रविवार, ७ एप्रिल रोजी देखील भाववाढ झाली.
शनिवार, ६ एप्रिल रोजी ७१ हजार १०० रुपये अशा उच्चांकी भावावर पोहचलेल्या सोन्याच्या भावात रविवारी १५० रुपयांची वाढ होऊन ते ७१ हजार २५० रुपये प्रति तोळा झाले. चांदीच्या भावात तर ६०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी आता ८१ हजार रुपयांच्या पुढे जाऊन ८१ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली.

Web Title: Silver next to 81 thousand, gold also increased to 71,250;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.