पंधरा वर्षांपासून सिग्नल बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:30 AM2018-09-10T00:30:50+5:302018-09-10T00:31:38+5:30

नगरपालिका व शहर वाहतूक शाखा यांच्यातील समन्वयाचा अभाव, देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष आणि अपुऱ्या कर्मचाºयामुळे सिग्नल गेल्या १५ वर्षांपासून बंद आहेत.

Signal off from fifteen years | पंधरा वर्षांपासून सिग्नल बंद

पंधरा वर्षांपासून सिग्नल बंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील वाहतुकीवर नियंत्रण आणि शिस्त लावण्यासाठी ठिकठिकाणी सिग्नल कार्यान्वित केले. शहरात तब्बल १४ ते १५ सिग्नल बसविण्यात आले. मात्र नगरपालिका व शहर वाहतूक शाखा यांच्यातील समन्वयाचा अभाव, देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष आणि अपुऱ्या कर्मचाºयामुळे सिग्नल गेल्या १५ वर्षांपासून बंद आहेत. मोठ्या संख्येने सिग्नल बंद पडल्यामुळे शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. सुटीच्या दिवशी तर नियोजनाअभावी शहराची कोंडी होत आहे.
शहरातील प्रमुख मार्गावरीलच सिग्नल बंद राहिल्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण नाही.
शहरातील कचेरी रोड, सिंधी बाजार, बसस्थानक, उडपी हॉटेल, शिवाजी पुतळा, शनी मंदिर, पाणीवेश यासह आदी ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले आहे. मात्र येथील सिग्नल बंद असल्यामुळे चौकातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण ठेवताना मोठी कसरत करावी लागत आहे. याकडे आता जिल्हाधिका-यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
पादचा-यांना तर
शहरात रस्ताच नाही!
शहरात नाही म्हणायला पादचा-यांसाठी फुटपाथ केले आहेत; पण त्या फुटपाथवरही छोटे-मोठे व्यावसायिक, फेरीवाले आदींनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचा-यांना रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊनच चालावे लागते. कारण, कुठला वाहनधारक कधी येऊन धडक देईल, याची शाश्वती राहिलेली नाही. रस्ता ओलांडण्यासाठी सिग्नल असणाºया चौकात झेब्रा क्रॉसिंग नाहीत, अशावेळी रस्ता कसा ओलांडायचा? असा प्रश्न पादचा-यांना पडतो.

दररोजच असते ट्रॅफिक जाम
बसस्थानक चौक, शनी मंदिर, गांधी चमन, पाणीवेश या ठिकाणी वाहनधारकांना दररोजच ट्रॅफिक जामच्या समस्येला सामोरे जावे लागते. या ठिकाणची वाहतूक व्यवस्था कायमस्वरूपी सुरळीत कशी होईल, यावर भर देण्याची आवश्यकता आहे; पण आतापर्यंत तरी तसे ठोस प्रयत्न झाल्याचे दिसत नाही.
पार्किंगची ठिकाणे वाढविण्याची गरज
बसस्थानक परिसर अशा काही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे; पण वाहनांची दिवसेंदिवस वाढती संख्या लक्षात घेता, हे पार्किंग पुरेसे नसल्याचे दिसते. त्यामुळे वाहने लावायची कुठे? असा प्रश्न वाहनधारकांना सतावतो.
पार्किंग-नो पार्किंग फलक नसल्याने गोंधळात भर
शहरातील काही मार्गांवर दिशादर्शक, पार्किंग, नो पार्किंग, वन-वे, सम-विषम तारखेचे फलक शोधूनही सापडत नाही. अशा स्थितीत वाहनधारकांना केवळ अंदाजाने वाहने चालवावी लागतात. त्यातून कधी-कधी नियम मोडला म्हणून वाहतूक पोलिसांकडून दंडही वसूल केला जातो. दिशादर्शक फलकांचा अभाव हेदेखील शहरातील वाहतूकीचा बोजवारा उडण्याचे प्रमुख कारण आहे.

Web Title: Signal off from fifteen years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.