प्रियकर शुभम व-हाडे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 01:05 AM2018-12-02T01:05:19+5:302018-12-02T01:05:33+5:30

छाया डुकरे खून प्रकरणातील महत्वाचा संशयित आरोपी आणि छायाचा प्रियकर शुभम वराडेला पारध पोलिसांनी ताब्यात घेतले.

Shubham Warhade arrested | प्रियकर शुभम व-हाडे ताब्यात

प्रियकर शुभम व-हाडे ताब्यात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : गाजलेल्या छाया डुकरे खून प्रकरणातील महत्वाचा संशयित आरोपी आणि छायाचा प्रियकर शुभम वराडेला पारध पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात छाया डुकरे हिचा तिचे वडील व अन्य नातेवाईकांनी महेगाव येथील जंगलात गळा आवळून खून केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणातील महत्वाचा दुवा असलेल्या छायाचा प्रियकर शुभम वराडेला भेटण्यासाठी म्हणून छायाला सोबत घेऊन तिचे वडील, दोन मावस काका तसेच आतेभाऊ हे भेटण्यासाठी गेले होते. पंरतु तेथून परततांना छायाचा खून केला होता. शुभमकडून पोलीस माहिती वधवून घेत आहेत.
आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ
छाया डुकरे खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या छायाचे वडिल समाधान डुकरे, महादू उगले, आण्णा (गणेश) लोखंडे ,रामधन दळवी यांना पारध पोलिसांनी भोकरदन न्यायालया समोर हजर केले असता त्यांना प्रथम १ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली होती. शनिवारी या चारही आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत चार डिसेंबर पर्यंत वाढ केल्याची माहती पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी दिली. त्यातच आता शुभम वराडेही हा हाती लागल्याने त्यातून मोठा खुलास होऊ शकतो.

Web Title: Shubham Warhade arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.