कैकाडी मोहल्ल्यात हातभट्ट्यांवर पुन्हा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:49 AM2018-08-18T00:49:00+5:302018-08-18T00:49:11+5:30

स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी सकाळी जुना जालना भागातील कैकाडी मोहल्यातील हातभट्टीच्या माध्यमातून उत्पादीत करणाऱ्या दारू अड्ड्यावर छापे टाकून त्या उद्ध्वस्त केल्या.

Police raid in Kakadi Mohalla | कैकाडी मोहल्ल्यात हातभट्ट्यांवर पुन्हा छापा

कैकाडी मोहल्ल्यात हातभट्ट्यांवर पुन्हा छापा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी सकाळी जुना जालना भागातील कैकाडी मोहल्यातील हातभट्टीच्या माध्यमातून उत्पादीत करणाऱ्या दारू अड्ड्यावर छापे टाकून त्या उद्ध्वस्त केल्या.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. विशेष म्हणजे या थेट छाप्यांमध्ये नव्यानेच रूजू झालेले अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार हे स्वत: सहभागी झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी दिली. गेल्या अनेक वर्षापासून या भागात हा व्यवसाय केला जातो.
या व्यवसायाच समूळ उच्चाटन करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले असून, त्यासाठी परिसरातील लोकांनाच आता हे अड्डे सुरू झाल्यावर पोलीसांना कळविण्याचे आवाहन केले. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले.
ही कारवाई यशस्वी करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी, कैलास कुरेवाड, सॅम्युअल कांबळे, संजय मगरे, प्रशांत देशमुख, रामेश्वर बधाटे, कृष्णा तंगे, रंजित वैराळ, समाधान तेलंग्रे, सागर बावीस्कर, सचिन चौधरी, विलास चेके, विष्णू कोरडे, संदीप मांटे, ज्योती खरात यांनी प्रयत्न केले.

Web Title: Police raid in Kakadi Mohalla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.