आॅनलाईन कामकाजाचा नवसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:33 AM2017-12-31T00:33:42+5:302017-12-31T00:34:02+5:30

जालना : सरत्या वर्षात पोलिसांच्या कामगिरीचा आलेख चढताच राहिला. अनेक गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणण्याबरोबरच विविध गुन्ह्यांमधील पाच कोटी तीस ...

More online work in new year | आॅनलाईन कामकाजाचा नवसंकल्प

आॅनलाईन कामकाजाचा नवसंकल्प

googlenewsNext

जालना : सरत्या वर्षात पोलिसांच्या कामगिरीचा आलेख चढताच राहिला. अनेक गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणण्याबरोबरच विविध गुन्ह्यांमधील पाच कोटी तीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. नववर्षात डिजिटल तंत्रज्ञान व आॅनलाईन कामाकाजाला प्राधान्य देत पोलीस प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा संकल्प पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी केला आहे.
पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत पोलीस दलाने वर्षभरात केलेल्या कामकाजाची तुलनात्मक माहिती दिली.
वर्ष २०१६ च्या तुलनेमध्ये २०१७ मध्ये गुन्ह्यास प्रतिबंध घालण्यास यश मिळाल्याने गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाली असून, गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढले आहे. गत वर्षीच्या तुलनेत खून, खुनाचा प्रयत्न, सरकारी नोकरांवर हल्ला या गुन्ह्यांमध्ये अनुक्रमे सहा, एक व २७ ने घट झाली आहे. गत वर्षात बलात्काराचे ४८ गुन्हे दाखल होते, सरत्या वर्षात त्यात दहाने घट झाली आहे. दामिनी पथकाच्या कामगिरीमुळे छेडछाडीसह विनयभंगाच्या गुन्ह्यांची संख्याही घटली आहे. सासरकडून होणारा महिलांचा छळ, हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त करणे या गुन्ह्यांमध्ये अनुक्रमे २३, १ व नऊने घट झाली आहे. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाणही या वर्षी चांगले राहिले. विशेषत: दुचाकी व चारचाकी वाहन चोरीचे अनेक गुन्हे गुन्हे शाखा व विशेष कृती दलाने उघडकीस आणले. २०१६ मध्ये पाच कोटी ८० लाख, आठ हजार २४८ रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. पैकी तीन कोटी सात लाख नऊ हजार २९२ रुपयांचा मुद्देमाल तपासात हस्तगत करण्यात आला होता. तर २०१७ मध्ये नऊ कोटी ६३ लाख ९४ हजार २८३ रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. पैकी पाच कोटी तीस लाख, २३ हजार ४६१ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गत वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण तीन टक्क्यांनी अधिक असून, औरंगाबाद परिक्षेत्रामधील सर्वात मोठी कारवाई असल्याचे अधीक्षक म्हणाले. वर्षभरात अवैध जुगाराच्या ४१७ तर, अवैध दारू विक्रीच्या एक हजार ७३९ कारवाई करण्यात आल्या आहेत. वाहतूक शाखेने विविध कारवायांमध्ये वर्षभरात २६ लाख १४ हजारांचा दंड वसूल केला. पत्रकार परिषदेस गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, वाहतूक शाखेचे संतोष पाटील यांची उपस्थिती होती.
--------------

गुन्हे शाखेची विशेष कामगिरी
स्थानिक गुन्हे शाखेला पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या नेतृत्वात सरत्या वर्षात वेगवेगळे गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळाले. खून, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोड्या, वाहन चोरी इ. ८६ गुन्हे उघडकीस आणले. गुन्हे शाखेने वर्षभरात विविध गुन्ह्यांच्या तपासातून तब्बल तीन कोटी, २८ लाख ४१ हजार, ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अंबड येथील गोविंद गगराणी व जालन्यातील नितीन कटारिया खून प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे शाखेने विशेष प्रयत्न केले. चारचाकी वाहनचोरांची आंतराज्य टोळीला जेरबंद करण्याची कारवाई लक्षवेधी ठरली.
-----------
चौदा जण हद्दपार
अवैध मटका बंद व्हावा या उद्देशाने मटका चालविणा-या २१ जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले. पैकी १४ जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. राज्यात दुस-यांदा व जिल्ह्यात प्रथमच अशी कारवाई करण्यात आल्याचे पोकळे यांनी सांगितले. तीन जणांवर मोकाअंतर्गत कारवाई झाली.
--------------
आॅनलाईन कामकाजाला प्राधान्य
सीसीटीएनएस कार्यप्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील १९९८ पासूनच्या गुन्ह्यांचे रेकॉर्ड आॅनलाईन केले जात आहे. तसेच प्रत्येक तक्रारीची आॅनलाईन नोंद घेतली जात असून, नागरिकांसाठी सिटीझन पोर्टल, आॅनलाईन किंवा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच पोलीस कर्मचा-यांना त्यांच्या सेवेबाबत तक्रार करण्यासाठी समाधान अ‍ॅप सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
-------------
महापोलीस पथदर्शी प्रकल्प
येणा-या वर्षात पोलीस प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी बीट पुनर्रचना कार्यपद्धती, प्रत्येक कर्मचा-यांना दोन गावांचे पालकत्व, आॅनलाइन पासपोर्ट पडताळणी, सायबर सेलचे सक्षमीकरण इ. कामांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

 

Web Title: More online work in new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.