मराठा आरक्षण आंदोलन : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 12:51 AM2018-08-08T00:51:04+5:302018-08-08T00:51:16+5:30

मराठा आंदोलनामुळे रद्द झालेल्या मेगा भरतीमुळे अनेकांचे नुकसान झाले असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी केल्याबद्दल जालना शहरासह जिल्ह्यात याचे संतप्त पडसाद उमटले. संतप्त मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलनस्थळी प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून जाहीर निषेध व्यक्त केला.

Maratha Reservation Movement: Congress State President's Prohibition | मराठा आरक्षण आंदोलन : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा निषेध

मराठा आरक्षण आंदोलन : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा निषेध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मराठा आंदोलनामुळे रद्द झालेल्या मेगा भरतीमुळे अनेकांचे नुकसान झाले असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी केल्याबद्दल जालना शहरासह जिल्ह्यात याचे संतप्त पडसाद उमटले. संतप्त मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलनस्थळी प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून जाहीर निषेध व्यक्त केला.
आंदोलनात कोणीही राजकारण करू नये असा इशारा ही यावेळी दिला. तथापी मुख्यमंत्र्यांनी आंदोलन स्थगित करण्यासाठी तहसीलदारांमार्फत पाठविलेले पत्र फाडून फेकत चर्चा नाही तर क्रांतीदिनी चक्काजामसह आंदोलन होईलच, असा निर्धार मराठा बांधवांनी व्यक्त केला.
संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनास सातव्या दिवशी मंगळवारी उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी ४०० जणांनी मुंडण केले. सलग तीन दिवसात ११०० समाज बांधवांनी मुंडण करून शासनाचा निषेध नोंदविला.
गुरूवारी होणाऱ्या चक्काजाम आंदोलनातही विविध ठिकाणी मुंडण आंदोलन सुरू राहणार आहे. मंगळवारी आंदोलनस्थळी मान्यवरांसह विविध घटकांनी भेटी देऊन पाठिंबा दर्शविला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे पत्र जिल्हा प्रशासनातर्फे तहसीलदार बिपीन पाटील यांनी आंदोलनस्थळी आणले. या पत्राचा आंदोलनातील समाज बांधवांनी मुद्देनिहाय खरपूस समाचार घेऊन ते फाडून फेकले.यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हसनाबाद : पिंपळगाव कोलते येथील नागरिकांनी मराठा आरक्षण व इतर मागण्यासाठी आज सकाळी राजूर ते फुलंब्री रोड वर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे बराच वेळ वाहतूक खोळंबली होती. भोकरदन येथून तहसील कार्यालयाचे आलेले प्रतिनिधी सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात प्रामुख्याने मराठा समाजाला त्वरित आरक्षण मिळावे, आंदोलना दरम्यान मराठा तरूणावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत असे नमूद करण्यात आले होते. राजूर, हसनाबाद, दाभाड, फुलंब्री, सिल्लोड औरंगाबादकडे जाणारी वाहतूक दोन तास खोळंबली होती. हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण बिडवे, उपनिरीक्षक गुलाब पठाण यांच्यासह मोठा बंदोबस्त तैनात होता.
जाफराबाद : जाफराबाद तालुका धनगर आरक्षण समन्वय समितीतर्फे मंगळवारी आयोजित चक्का जाम आंदोलनात हजारो धनगर समाज बांधवांनी शेळ्या मेंढ्यासह सहभाग घेऊन धनगर समाजाला अनुसूचित प्रवर्गात सामावून घेऊन या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच जामखेड येथील डॉ.इंद्रकुमार भिसे आणि सहकाºयांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे इ. मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
चक्का जाम आंदोलनास अहिल्यादेवी होळकर चौक येथून सुरवात होऊन तहसील कार्यालय परिसरात एकत्र येत हे आंदोलन तब्बल पाच तास करण्यात आले. याचा मोठा फटका शहरातील वाहतुकीस बसला होता.
आंदोलकांनी महाराष्ट्र शासनाचा निषेध व्यक्त करत गेल्या चार वर्षात मंत्रिमंडळाच्या १५० कॅबिनेट बैठका होऊनही धनगर समाजाला दिलेले आश्वासन पाळले नाही. शासनाने समाजाची फसवणूक केली आणि त्यातून समाजात उद्रेकाची भावना निर्माण झाली असे म्हणत आरक्षण लागू करा अशी मागणी करण्यात आली. यावेळी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
या वेळी सुरेश दिवटे, विठ्ठल राधवन, दीपक बोराडे, दामोदर वैद्य, कैलास दिवटे, प्रकाश दिवटे, श्याम वैद्य, लक्ष्मण शेवाळे, राम गुरव, दत्ता सोनसळे, सचिन मुकूटराव, सचिन खांडेकर, सचिन देशमुख, कृष्णा जोशी, निवृत्ती दिवटे, प्रवीण सोरमारे, संतोष कोल्हे, साहेबराव खंबाट, शोभा मतकर, निवृत्ती दिवटे, सुदाम रोडगे, यांच्यासह समाज बांधवाची मोठी उपस्थिती होती.

Web Title: Maratha Reservation Movement: Congress State President's Prohibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.