Maharashtra Bandh : मराठा क्रांती मोर्चाकडून जालना जिल्ह्यात चक्काजाम; कडकडीत बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 11:51 AM2018-08-09T11:51:55+5:302018-08-09T12:02:20+5:30

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात ठिक -ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत असून, जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.

Maharashtra Bandh: Maratha Kranti Morcha's Chakkajam in Jalna district | Maharashtra Bandh : मराठा क्रांती मोर्चाकडून जालना जिल्ह्यात चक्काजाम; कडकडीत बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट

Maharashtra Bandh : मराठा क्रांती मोर्चाकडून जालना जिल्ह्यात चक्काजाम; कडकडीत बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट

Next

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात ठिक -ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत असून, जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. परिणामी, जालना शहरात शुकशुकाट पाहवयास मिळत आहे.

जिल्ह्यासह शहरात सकाळपासूनच चक्काजाम आंदोलन सुरु करण्यात आहे. जिल्ह्यातील जाफराबाद, अबंड, घनसावंगी, बदनापूर, भोकरदन, परतूर, मंठा, याठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात येत  आहे. तर  शहरातील अंबड चौफुली, औरंगाबाद चौफुली, मंठा चौफुली यासह आंदोलन सुरु आहेत.

बससेवा बंद
चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून जिल्हाभरातील बससेवा बंद आहे. त्यामुळे जालना बसस्थानकातून एकही बस धावली नाही.

पेट्रोल पंपही बंद
आंदोलनामुळे शहरातील जवळपास सर्वच पेट्रोल पंप बंद आहे. परिणामी, वाहनाधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहेत.

घनसावंगी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद 
- अंबड बसस्थानाकातून एकही बस घनसावंगी तालुक्यात आली नाही.
- शाळा-महाविद्यालय बंद, तालुक्यातील प्रत्येक गावात कडकडीत बंद
- अनेक गावात सामूहिक मुंडन
- ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त आहे 
- विशेष पथक तैनात 


परतुरात कडकड़ित बंद
- रेल्वे,बसस्थानकात शुकशुकाट
-  शाळा, महाविद्यालय बंद, शासकीय कार्यालयही बंद
-  नेहमी गजबजलेले शहर निर्मनुष्य असल्याचे चित्र आहे
-  वातुर फाटा व् यदलपुर या जालना मंठा रोडवर काही काळ रास्ता रोको 

Web Title: Maharashtra Bandh: Maratha Kranti Morcha's Chakkajam in Jalna district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.