अखेर खोतकरांची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांचा सांगावा येताच 'खोतकर-दानवे पॅचअप'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 11:49 AM2019-03-04T11:49:49+5:302019-03-04T11:50:01+5:30

आज सकाळी सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांच्या निवास्थानी भेट घेतली.

Khotkar's sword finally down | अखेर खोतकरांची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांचा सांगावा येताच 'खोतकर-दानवे पॅचअप'

अखेर खोतकरांची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांचा सांगावा येताच 'खोतकर-दानवे पॅचअप'

Next

- संजय देशमुख 

जालना : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे विशेष दूत म्हणून सहकारमंत्री सुभाष देशमुख आज सकाळी ९ वाजता राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थांनी आले होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या तिघांची पाऊण तास बंद दाराआड चर्चा झाली. 

चर्चानंतर पत्रकारांशी बोलतांना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले की, खोतकर आणि दानवे यांच्यात तात्वीक मतभेद होते. परंतु, ते आता निवळले असून, मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत खोतकर, दानवे यांची चर्चा होणार असल्याचे ते म्हणाले. अर्जुन खोतकर यांनी आपण अद्यापही मैदानात असल्याचे सांगून माझ्या संदर्भातील निर्णय पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हेच घेणार आहेत, त्यांनी घेतलेला निर्णय आपल्यासाठी अतिंम निर्णय राहणार असल्याचे सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याची अधिकृत घोषणा उद्या होणार आहे. 

वादाचा इतिहास काय?

जालना बाजार समितीच्या निवडणुकीत संचालकपदाच्या जास्त जागा भाजपने मागितल्या होत्या. त्या देण्यावरून खोतकर आणि दानवे यांच्यात रस्सीखेच झाली होती. शेवटी तीन जागा शिवसेनेने भाजपला देतानाच खा. रावसाहेब दानवे यांचे चुलतबंधू भास्कर दानवे यांना उपसभापतीपद दिले. हा वाद मिटतो न मिटतो तोच २०१६ मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. त्यात भाजपला सर्वाधिक २२, तर शिवसेनेला १५ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी भाजपसोबत युती करून जिल्हा परिषद युतीच्या ताब्यात ठेवावी असा आग्रह दानवे यांनी धरला होता. तो फेटाळून लावत अर्जुन खोतकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी संधान साधून जिल्हा परिषदेत चुलत भाऊ अनिरुद्ध खोतकर यांना अध्यक्षपदी विराजमान केले. उपाध्यक्षपदही राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सतीश टोपे यांच्याकडे दिल्याने दानवे आणि खोतकरांमधील दरी वाढत गेली. त्यातच लोकसभा निवडणुकीला एक वर्ष शिल्लक असतानाच खोतकर यांनी दानवे यांच्याशी दोन हात करण्याचा निर्णय जाहीर केल्यावर तर दानवे-खोतकर हा वाद आणखी गडद होत गेला. 

Web Title: Khotkar's sword finally down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.