उच्चशिक्षित युवकाने शोधला शेतीत रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:09 AM2018-04-17T01:09:10+5:302018-04-17T01:09:10+5:30

शेती तोट्याची म्हणून अनेक युवक नोकरीच्या मागे धावताना दिसत आहेत. मात्र पारंपरिक शेतीला फाटा देत नवीन प्रयोग केल्याच कमी क्षेत्रातही चांगले उत्पन्न मिळविता येते हे खानापूर (ता.जाफराबाद) येथील सतीश दत्तू तायडे या युवकाने दाखवून दिले आहे.

High-educated youth seeks employment in farming | उच्चशिक्षित युवकाने शोधला शेतीत रोजगार

उच्चशिक्षित युवकाने शोधला शेतीत रोजगार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभूर्णी : शेती तोट्याची म्हणून अनेक युवक नोकरीच्या मागे धावताना दिसत आहेत. मात्र पारंपरिक शेतीला फाटा देत नवीन प्रयोग केल्याच कमी क्षेत्रातही चांगले उत्पन्न मिळविता येते हे खानापूर (ता.जाफराबाद) येथील सतीश दत्तू तायडे या युवकाने दाखवून दिले आहे.
जाफराबाद तालुक्यातील खानापूर येथील युवा शेतकरी सतीश दत्तू तायडे यांनी पदवीपर्यंचे शिक्षण घेवून शेतीतच रोजगार शोधला आहे. बी.एससी होर्टिकल्चर झालेल्या सतीशने वडिलोपार्जित शेतीत दुहेरी पीक पद्धतीचा अवलंब कात सिड्स बियाणे उत्पादनातून वर्षाकाठी दहा ते बारा लाखांचे मिळवले आहे. सतीश यांनी कपाशीचे पीक काढल्यानंतर टरबूज, वांगे, काकडी, कारले या पिकांचे गुंठेवारी सीड्स प्लॉट घेण्यास सुरुवात केली. रासायनिक खते, कीटकनाशकांचा कमी वापर केला. सध्या त्यांच्या शेतातील २० गुंठे टरबूज सीडस प्लॉटस आहे. टरबूज बियाणे विक्रीतून तायडे यांना खर्च वजा जाता अडीच लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. सतीश याच्याबरोबर शेतात आई-वडील, भाऊ असा संपूर्ण परिवार परीश्रम घेत आहेत.

Web Title: High-educated youth seeks employment in farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.