सोने, चांदी खरेदीची मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 12:34 AM2018-11-05T00:34:10+5:302018-11-05T00:34:25+5:30

विवारी सराफा बाजारपेठेत शहरवासियांनी सोने, चांदी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमणात गर्दी केली होती.

Demand for gold, silver in Diwali | सोने, चांदी खरेदीची मागणी वाढली

सोने, चांदी खरेदीची मागणी वाढली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहुर्त म्हणून दिपावली सणाला गणले जाते. यामुळे अनेकजण या सणाच्या शुभ मुहर्तावर काही तरी नवीन खरेदी करतात. तर अनेक जण सुख, शांती मिळावी व धनप्राप्ती व्हावी, यासाठी दिपावलीला सोने, चांदिची मोठ्या प्रमणात खरेदी करतात. आता दिपावली सण अवघ्या दोन दिवसांवर आला असल्याने रविवारी सराफा बाजारपेठेत शहरवासियांनी सोने, चांदी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमणात गर्दी केली होती.
आठ- दहा दिवसांपूर्वी बाजारपेठेत शांतता दिसत होती. परिणामी नागरिकांना दुष्काळ असल्यामुळे हे चित्र असल्याचे जाणवत होते. पण, दिपावली सण दोन-चार दिवसांवर येताच नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करायला सुरूवात केली असून दिवसागणीक नागरिकांची गर्दी बाजारपेठेत अधिक वाढत चालली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सराफा बाजारपेठेत शुकशुकाट दिसत होता. परंतु आता दिपावलीजवळ येताच येथेही नागरिकांनी गर्दी करायला सुरूवात केली आहे. या सणाला अनेक जण चांगले मुहूर्त आहे म्हणून सोने-चांदीची मोठ्याप्रमणात खरेदी करतात. काही आर्थिक गुंतवणुकीचे साधन म्हणून खरेदी करतात. तर काहीजण सोने-चांदीत गुंतविलेला पैसा म्हणजे बुडीत नाही. म्हणून सोने खरेदी करीत असल्याचे नागरिकांनी सांगितले. यंदा सराफा बाजारपेठेत सर्वात जास्त सोन्याचे नाणे आणि चांदीच्या शिक्यांची मोठी मागणी आहे.

Web Title: Demand for gold, silver in Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.