जालन्यातील इंग्रजकालीन लोखंडी पूलाच्या नूतनीकरणाला मुहूर्त लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 07:46 PM2018-07-05T19:46:32+5:302018-07-05T19:47:44+5:30

नवीन आणि जुना जालन्याला जोडणार कुंडलिका नदीवरील लोखंडी पूल हा इंग्रजांच्या काळात बांधलेले आहे. या पुलाच्या नूतनीकरणासाठी दहा कोटी रूपये मंजूर करण्यात आल्याचे यापूर्वीच खा. रावासाहेब दानवे यांनी जाहीर केले होते.

The burning of the iron-clad era in Jalna will not be auspicious for renewal | जालन्यातील इंग्रजकालीन लोखंडी पूलाच्या नूतनीकरणाला मुहूर्त लागेना

जालन्यातील इंग्रजकालीन लोखंडी पूलाच्या नूतनीकरणाला मुहूर्त लागेना

googlenewsNext

जालना : नवीन आणि जुना जालन्याला जोडणार कुंडलिका नदीवरील लोखंडी पूल हा इंग्रजांच्या काळात बांधलेले आहे. या पुलाच्या नूतनीकरणासाठी दहा कोटी रूपये मंजूर करण्यात आल्याचे यापूर्वीच खा. रावासाहेब दानवे यांनी जाहीर केले होते. मात्र, आता वर्ष लोटल्यावरही या पुलाच्या कामाला मुहूर्त लागत नसल्याचे वास्तव आहे.

हा पूल बांधल्याला आता जवळपास शंभरवर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. वीस वर्षापूर्वी ज्या इंग्रज कंपनीने हा पूल बांधला होता, त्या कंपनीने जालना नगर पालिकेला पूल आता वाहतूकीसाठी वापरू नये असे पत्र पाठवले होते.मध्यंतरी शहरातील जड वाहनांची वाहतूकही याच पुलावरून होत होती. आता शहरातून जड वाहनांना प्रवेश बंदी केल्याने या पुलाचे आयुष्य वाढले आहे.

मध्यंतरी नगरसेविका तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य संध्या देठे यांनी हा मुद्दा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही मांडला होता. त्याची दखल घेत, खा. दानवे यांनी त्यासाठी तातडीने दहा कोटी रूपये मंजूर केले होते. मात्र, नंतर त्या पुलाच्या बांधकामासाठीच्या हालचाली मागे पडल्या आहेत. या संदर्भात पाकिलेत संपर्क केला असता, अद्याप पूल बांधणीसाठीच्या कुठल्याच हालाचाली सुरू नसल्याचे सांगण्यात आले.याकडे आता नगराध्यक्षांनीच लक्ष घालावे. 

प्रश्न मांडून तीनवर्ष लोटली
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आपण या पुलाचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, त्याला आता तीनवर्ष लोटले आहेत, केवळ निधी मंजूर झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्यापपर्यंत पालिकेने ना सार्वजनिक बांधक विभगााने याकडे लक्ष दिल्याचे दिसत नाही. यासाठी पालिका तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून पुलाचे नूतीनकरण करावे अशी आपली आजही मागणी कायम आहे.
- संध्या देठे, नगरसेविका , जालना

Web Title: The burning of the iron-clad era in Jalna will not be auspicious for renewal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.