बँकांच्या संपाचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:55 AM2018-05-31T00:55:32+5:302018-05-31T00:55:32+5:30

वेतनवाढीच्या मागणीसाठी राष्ट्रीयीकृत बँकांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. शहरातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा बुधवारी बंद असल्याचे पहावयास मिळाले.

Banks strike affects farmers | बँकांच्या संपाचा शेतकऱ्यांना फटका

बँकांच्या संपाचा शेतकऱ्यांना फटका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वेतनवाढीच्या मागणीसाठी राष्ट्रीयीकृत बँकांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. शहरातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा बुधवारी बंद असल्याचे पहावयास मिळाले. याचा सर्वाधिक फटका पीककर्जासाठी शहरात आलेल्या शेतक-यांना बसला. संपाची माहिती नसल्यामुळे शेतकरी सकाळीच बँकांसमोर उभे असल्याचे दिसून आले.
संपामुळे शहरातील बँक आॅफ इंडिया, स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सर्व शाखा, आयडीबीआय बँक, कॅनरा बँक, बँक आॅफ महाराष्ट्र, बँक आॅफ बडोदा, विजया बँक आदींच्या शाखा बंद असल्याचे दिसून आले. शिवाजी पुतळा परिसरातील सीबीआय बँकेच्या शाखेसमोर नेहमीप्रमाणे असणारी वर्दळ दिसली नाही.
कर्मचाºयांनी काही वेळ बँकेसमोर निदर्शने केली. दरम्यान, सध्या अनेक बँकांमध्ये पीककर्जाचे वाटप सुरू आहे. शेतकरी दररोज बँकेत गर्दी करत आहेत. बँकांच्या आजच्या संपाबाबत पूर्वकल्पना नसल्याने शेतकरी सकाळी बँकेत आले. बँकांचा संप असल्याचे समजल्यानंतर शेतकरी आल्या पावलांनी परत फिरले. तालुका पातळीवरील राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांध्येही असेच चित्र पहावयास मिळाले.
बँकेशी संबंधित काम असणा-यांची गैरसोय झाली. एटीएममध्येही पैसे नसल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, बँकांच्या संपामुळे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प राहिले. गुरुवारीही संप सुरू राहणार असल्याने व्यवहारांवर परिणाम होणार आहे.

Web Title: Banks strike affects farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.