भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 12:31 AM2018-09-09T00:31:16+5:302018-09-09T00:31:37+5:30

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या निषेधार्थ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी पुकारलेल्या भारत बंदला जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी आयोजित एका बैठकीत सांगीतले.

Appeal to participate in India bandh | भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या निषेधार्थ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी पुकारलेल्या भारत बंदला जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी आयोजित एका बैठकीत सांगीतले.
जालना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रितीसुधानगर येथे शनिवारी ायोजीत बैठकीत अध्यक्षस्थानावरून गोरंट्याल बोलत होते. या प्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष भीमराव डोंगरे, प्रदेश सरचिटणीस कल्याणराव दळे, प्रदेश सचिव विजय कामड, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, गटनेते गणेश राऊत, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष विमल आगलावे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राख, युवानेते अक्षय गोरंट्याल, राम सावंत, बदर चाऊस, दिनकर घेवंदे, शेख शमशु, महाविर ढक्का आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गोरंट्याल यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या एकूणच निर्णयाचा त्यांच्या खास शैलित समाचार घेतला. महागाई कमी करून अच्छे दिन हे कागदावरच राहिले असून, आज जनता हैराण झाली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर हे गगनाला भिडल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले. त्यामुळे बंदमध्ये जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी भीमराव डोंगरे, कल्याण दळे, विजय कामड आदींनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या बैठकीस राजेंद्र जैस्वाल, नगरसेवक जीवन सले, रमेश गौरक्षक, बालकृष्ण कोताकोंडा, नगरसेवीका संगीता पाजगे, विना सामलेट, संजय भगत, अशोक भगत, राजस्वामी, विनोद रत्नपारखे, वैभव उगले, शिवराज जाधव, शमीम कुरेशी, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शेख महेमूद यांनी केले. सूत्रसंचालन राम सावंत यांनी केले. वसंत जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Web Title: Appeal to participate in India bandh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.