पाणीपुरवठ्यासाठी २१० विहिरींचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 01:11 AM2018-05-14T01:11:57+5:302018-05-14T01:11:57+5:30

वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. परिणामी अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून ५९ गावांसह आठ वाड्यांमध्ये ६८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, २१० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

Acquisition of 210 wells for water supply | पाणीपुरवठ्यासाठी २१० विहिरींचे अधिग्रहण

पाणीपुरवठ्यासाठी २१० विहिरींचे अधिग्रहण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. परिणामी अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून ५९ गावांसह आठ वाड्यांमध्ये ६८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, २१० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
जिल्ह्यात उन्हाचा पारा ४१ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे जलस्त्रोतांमधील पाणी आटत आहे. याचा परिणाम ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावही झाला आहे.अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी महिलांना दूरच्या विहिरीवरून शेंदून पाणी आणावे लागत आहे. पाणीटंचाई जाणवत असलेल्या ५९ गावांसह आठ वाड्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. भोकरदन व जाफराबाद तालुक्यात सर्वाधिक टंचाईग्रस्त गावे आहेत. तुलनेत जालना, बदनापूर, घनसावंगी तालुक्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी आहे. अंबड आणि मंठा तालुक्यातील एकाही गावात सध्या तरी टंचाईसदृश्य परिस्थिती नसल्याने एकही टँकर सुरू करण्यात आलेले नाही. सध्या जिल्ह्यात ५९ गावे व आठ वाड्यांसाठी १९ शासकीय तसेच ४९ खाजगी, अशा एकून ६८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टँकर भरण्यसाठी ६५ व टँकरव्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी १४५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे येत्या काही दिवसात टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत भर पडण्याची शक्यता आहे.
२४ तासांत टँकरद्वारे पाणीपुरवठ्याच्या सूचना
पिण्याच्या पाण्याचे कोणतेही स्त्रोत नसलेल्या टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी सरपंचांनी प्रस्ताव सादर केल्यापासून २४ तासात टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. कामात हयगय केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Acquisition of 210 wells for water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.