मुले चोरणारे समजून बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:23 AM2018-06-17T00:23:51+5:302018-06-17T00:23:51+5:30

सध्या मुले चोरणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरली आहे. याच संशयावरुन भीक मागणाऱ्या दोन महिला आणि दोन मुलांना जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी बसस्थानक परिसरात घडली.

2 hit by mob by misunderstanding | मुले चोरणारे समजून बेदम मारहाण

मुले चोरणारे समजून बेदम मारहाण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मंठा : तालुक्यात सध्या मुले चोरणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरली आहे. याच संशयावरुन भीक मागणाऱ्या दोन महिला आणि दोन मुलांना जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी बसस्थानक परिसरात घडली.
ईद सणानिमित्त सविता राजू चव्हाण (२२) (रा. चारठाणा जिंतूर जि. परभणी), हेमा भगवान पवार रा. ब-हारपूर (ता. लोणार जि. बुलडाणा) तसेच सचिन रामभाऊ पाटोळे, संभाजी संजय पारखे (रा. वाटूर ता. परतूर) हे बसस्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ईद सणानिमीत्त भीक मांगत परिसरात फिरत होते. सदरील दोन महिला आणि तरुण मुले पळविणारे असल्याचा संशय आल्याने नागरिकांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक मारहाण सुरु झाल्याने भयभीत झालेल्या महिला आणि तरूणांनी आरडाओरड केली. गस्तीवर असलेलेल पोलीस परिसरात तातडीने घटनास्थळी पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. यामुळे शहरात अचानक अफवा पसरल्याने घराबाहेर पडलेल्या आपल्या मुलांना शोधण्यासाठी आई, वडिलांची धावपळ दिसून आली.

Web Title: 2 hit by mob by misunderstanding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.