जगात जिथेही जाल तिथे दिव्यासारखा प्रकाश पसरवा- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 07:33 AM2018-10-29T07:33:56+5:302018-10-29T07:45:21+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या जपानच्या दौ-यावर आहेत.

"You're Like Diwali Lamps Spreading Light": PM Modi To Indians In Japan | जगात जिथेही जाल तिथे दिव्यासारखा प्रकाश पसरवा- मोदी

जगात जिथेही जाल तिथे दिव्यासारखा प्रकाश पसरवा- मोदी

Next

टोकियो- पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या जपानच्या दौ-यावर आहेत. भारत-जपानदरम्यान 13व्या वार्षिक संमेलनात सहभागी होण्यासाठी नरेंद्र मोदी टोकियोमध्ये दाखल झाले आहेत. मोदी आणि जपानच्या पंतप्रधानांमध्ये दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सप्टेंबर 2014ला जपानला पहिल्यांदा भेट दिली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानचे पंतप्रधान शिंजो आबेंबरोबर 12वी बैठक करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी टोकियोतल्या भारतीय समुदायातील लोकांच्या एका कार्यक्रमात पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी जपानमधील भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित केलं. दिवाळीच्या दिवसांत ज्याप्रमाणे दिवा सगळीकडे प्रकाश पसरवत असतो. त्याच पद्धतीनं तुम्ही जगभरात भारताचा नावलौकिक वाढवा, याच माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. देश मोठ्या बदलांना सामोरा जात आहे.





जनधन, आधार आणि मोबाइलच्या वापरामुळे भारतात पारदर्शकता आली आहे. त्यामुळेच भारताकडे दुसरे विकसनशील देशही प्रभावित झाले आहे. भारताच्या असलेल्या यंत्रणेचा अभ्यास केला जातोय. तसेच भारतातल्या BHIM App आणि Rupay Card संदर्भात अनेक देशांना उत्कंठा आहे. भारतात जवळपास 100 कोटी मोबाईल धारक असावेत, अशात भारतात 1 जीबी डेटा हा कोल्ड ड्रिंकच्या एका छोट्याशा बॉटलपेक्षाही कमी किमतीत मिळतो.
आपण फार कमी खर्चात चांद्रयान आणि मंगळयान अवकाशात पाठवलं आहे. आता 2022मध्ये भारत गगनयान पाठवण्याच्या तयारीला लागला आहे. गगनयान हे पूर्णतः भारतीय बनावटीचं असणार आहे आणि त्यातून अंतरिक्षात प्रवास करणाराही भारतीयच असेल. 

 

Web Title: "You're Like Diwali Lamps Spreading Light": PM Modi To Indians In Japan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.