103 वर्षांनंतर पहिल्या महायुद्धातील सैनिकाची चॉकलेटस सापडली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 11:57 AM2018-06-11T11:57:46+5:302018-06-11T11:57:46+5:30

या चॉकलेटसचा लिलाव करण्यात आला. चॉकलेट्सच्या एका डब्यात दहा चॉकलेट्स असत, त्यापैकी नऊ शिल्लक आहेत.

World War One soldier Richard Bullimore's 103-year-old chocolate found | 103 वर्षांनंतर पहिल्या महायुद्धातील सैनिकाची चॉकलेटस सापडली

103 वर्षांनंतर पहिल्या महायुद्धातील सैनिकाची चॉकलेटस सापडली

Next

लंडन- जागतिक महायुद्धाने संपूर्ण जगाचा इतिहास-भूगोल बदलून टाकला. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचे पडसाद अजूनही जागतिक राजकारणावर पडत असल्याचे दिसून येते. लाखो सैनिकांनी या युद्धांमध्ये प्राण गमावले. या युद्धांच्या संदर्भातील अनेक आठवणी आजही जगभरात जागवल्या जातात. पहिल्या महायुद्धातील सैनिकाची नऊ चॉकलेटस नुकतीच सापडली आहेत. त्याचा नुकताच लिलाव करण्यात आला.

लिसेस्टरशायर रेजिमेंटच्या रिचर्ड बुलीमोअर या सैनिकाच्या साहित्यामध्ये एका डब्यामध्ये ही नऊ चॉकलेटस आढळली आहेत. या युद्धामध्ये रिचर्ड यांची पलटण फ्रान्समध्ये तैनात होती. त्यांना युद्ध सुरु झाल्यावर पहिल्या ख्रिसमसमध्ये त्यांना ही चॉकलेटस देण्यात आली होती. ही चॉकलेटस नॉटिंगहॅमशायरमधील मॅन्सफिल्ड येथे तयार करण्यात आलेली होती. चॉकलेटसच्या या डब्यातील 10 चॉकलेटसपैकी एक चॉकलेट संपविण्यात आलेले आढळले. रिचर्ड यांना प्रिन्सेस मेरी टोबॅको गिफ्ट बॉक्सही मिळाल्याचे आढळले आहे. या बॉक्समध्ये सिगारेटस, तंबाखू आणि सिगारेट पेटवण्यासाठी काड्या असल्याचे दिसू आले. त्यातील बऱ्यापैकी साहित्य जसेच्या तसे आढळून आले मात्र तीन सिगारेट कमी आहेत.

चॉकलेट्स, सिगारेट बॉक्स, पदके. प्रमाणपत्रे, पदव्या आणि इतर सर्व साहित्याला लिलावामध्ये 2 हजार पौंड इतकी किंमत मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: World War One soldier Richard Bullimore's 103-year-old chocolate found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.