अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना महिला का पाठवताहेत गर्भ निरोधक बिल?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 09:00 AM2017-10-27T09:00:38+5:302017-10-27T09:35:41+5:30

ओबामा केअरचे गर्भनिरोधक जनादेश मागे घेण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे त्रास सहन करणा-या महिलांनी आता व्हाईट हाऊसवरच गर्भनिरोधकाच्या खर्चाचे बिल पाठवण्यात सुरुवात केली आहे.

women send bills for birth control to president donald trump | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना महिला का पाठवताहेत गर्भ निरोधक बिल?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना महिला का पाठवताहेत गर्भ निरोधक बिल?

Next

वॉशिंग्टन - ओबामा केअरचे गर्भनिरोधक जनादेश मागे घेण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे त्रास सहन करणा-या महिलांनी आता व्हाईट हाऊसवरच गर्भनिरोधकाच्या खर्चाचे बिल पाठवण्यात सुरुवात केली आहे. 'द हिल पत्रिके'तील वृत्तानुसार 'The Keep Birth Control Copay Free' या अभियानांतर्गत एका वेबसाइटची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून त्रस्त महिला व्हाईट हाऊसवर आपले गर्भनिरोधकाच्या खर्चाचे बिल पाठवू शकतात.    

या महिलांच्या नियुक्त बॉसनं ही योजना पुढे न नेण्याचा निर्णय घेतल्यास महिलांवर गर्भ निरोधकासंबंधीचा खर्चाचा किती भार वाढणार आहे, याची माहिती या वेबसाइटद्वारे देण्यात येत आहे. गर्भ निरोधक जनादेश मागे घेण्याच्या निर्णयामुळे त्रस्त झालेल्या महिला वेबसाइटवर गर्भनिरोधक प्रिस्क्रिप्शन अपलोड करू शकतात आणि तेथून या सर्व बाबी व्हाईट हाऊस आणि आरोग्य आणि मानव सेवा विभागाकडे पोहोचवण्यात येतील, अशी माहिती समोर आली आहे.

ट्रम्प प्रशासनानं ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला ओबामा केअरचा गर्भनिरोधक जनादेश मागे घेण्याची घोषणा केली होती. दरम्यान, या आदेशात कर्मचारी आरोग्य संगोपन योजनोंमध्ये गर्भ निरोधकाचाही समावेश करु शकत होते. मात्र, ज्या महिलांना पूर्वीपासून गर्भ निरोधकसंबंधीच्या खर्चाची रक्कम मिळत होती, अशा लाखो अमेरिकी महिलांवर ट्रम्प प्रशासानाच्या या निर्णयाचा परिणाम सहन करावा लागू शकतो. यालाच विरोध करत महिलांना ट्रम्प प्रशासनाविरोधात आंदोलन छेडत आता गर्भनिरोधकाच्या खर्चाचे बिल व्हाईटवर हाऊसवर पाठवण्यात सुरुवात केली आहे. 

Web Title: women send bills for birth control to president donald trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.