कंगाल पाकिस्तानला कुणी दिला ७० कोटी डॉलरचा चेक? एवढ्या पैशांचं करणार काय...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 02:26 PM2024-01-12T14:26:34+5:302024-01-12T14:27:03+5:30

आर्थिकदृष्ट्या कंगाल झालेल्या पाकिस्तानला मोठा दिलासा मिळाला आहे. पाकिस्तानसाठी ७० कोटी डॉलरच्या  बेलआऊट फंडच्या चेकला मान्यता मिळाली आहे. ही ...

Who gave a check of 70 million dollars to poor Pakistan? What to do with so much money... | कंगाल पाकिस्तानला कुणी दिला ७० कोटी डॉलरचा चेक? एवढ्या पैशांचं करणार काय...

कंगाल पाकिस्तानला कुणी दिला ७० कोटी डॉलरचा चेक? एवढ्या पैशांचं करणार काय...

आर्थिकदृष्ट्या कंगाल झालेल्या पाकिस्तानला मोठा दिलासा मिळाला आहे. पाकिस्तानसाठी ७० कोटी डॉलरच्या  बेलआऊट फंडच्या चेकला मान्यता मिळाली आहे. ही रक्कम अडचणीत असलेल्या पाकिस्तानला खूप उपयुक्त ठरणारी असून, मदतीमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत थोडीफार सुधारणा होऊ शकते. 

पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या वित्त मंत्रालयाने सांगितले की, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी मंडळासोबत पहिली समीक्षा पूर्ण झाली आहे.  आयएनएफने आर्थिक सुधारणा कार्यक्रमाची पहिली सुधारणा पूर्ण केल्यानंतर सध्याच्या ३ अब्ज अमेरिकन डॉलरच्या बेलआऊट पॅकेजअंतर्गत ७० कोटी अमेरिकन डॉलरच्या कर्जाच्या हप्त्याला मान्यता दिली आहे. 

वॉशिंग्टन स्थित आयएमएफने एका मिशनअंतर्गत जुलै ते सप्टेंबरदरम्यावनच्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचं समीक्षण केलं आहे. त्यानंतर लगेचच आयएमएफने ७० कोटी अमेरिकन डॉलरच्या वितरणाला मान्यता दिली.  त्यामुळे स्टँड बाय अरेंजमेंटअंतर्गत एकूण वितरण १.९ अब्ज अमेरिकन डॉलर एवढं झालं आहे. आयएमएफकडून १.२ अब्ज अमेरिकन डॉलरचा सुरुवातीचा हप्ता हा जुलै २०२३ मध्ये वितरित करण्यात आला होता. त्यानंतरचे हप्ते हे समीक्षेनंतर वितरित करण्यात येणार होते.  

आयएमएफने कर्जात बुडालेल्या पाकिस्तानला आणखी कर्ज देण्यासाठी जून २०२३ मध्ये पाकिस्तानसोबत नऊ महिन्यांच्या ३ दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या वित्तपोषण व्यवस्थेवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये स्टँडबाय व्यवस्थेंतर्गत पहिल्या समीक्षणासंदर्भात आयएमएफचे कर्मचारी आणिपाकिस्तानी अधिकाऱ्यांमध्ये सहमती झाली होती.  

गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही अडचणीत आलेली असून, त्यामुळे जनता महागाईने त्रस्त झालेली आहे. तसेच बहुसंख्य लोकांना उदरनिर्वाह करणं कठीण बनलं आहे. तसेच पाकिस्तान परकीय चलन मिळवण्यासाठीही संघर्ष करत आहे.  

Web Title: Who gave a check of 70 million dollars to poor Pakistan? What to do with so much money...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.