सेल्फी घेतानाच बॉम्बस्फोटात उडाली दहशतवाद्यांची टोळी, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 02:47 PM2019-02-22T14:47:13+5:302019-02-22T14:48:12+5:30

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं दहशतवाद्यांचा सफाया करण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आहे.

video terrorist killed in a blast while taking selfie | सेल्फी घेतानाच बॉम्बस्फोटात उडाली दहशतवाद्यांची टोळी, व्हिडीओ व्हायरल

सेल्फी घेतानाच बॉम्बस्फोटात उडाली दहशतवाद्यांची टोळी, व्हिडीओ व्हायरल

Next

नवी दिल्ली- पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं दहशतवाद्यांचा सफाया करण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. त्याच दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात दहशतवाद्यांची पूर्ण टोळी बॉम्बच्या स्फोटात उडाल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे या बॉम्बचा स्फोट सेल्फी घेत असताना झाला आहे. काही दहशतवादी एका खोलीत बसून जल्लोष करत होते. त्यातील एक दहशतवादी गाणं गात होता. तर इतर दहशतवादी त्याला साथ देत होते.

त्याचदरम्यान एका दहशतवाद्यानं सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला असता, ही दहशतवाद्यांची पूर्ण टोळी बॉम्बस्फोटात उडाली. गाणं गात असतानाच दुसऱ्या एका दहशतवाद्यानं सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. मोबाईलवर सेल्फी घेण्यासाठी क्लिक करताच ती दहशतवाद्यांची टोळी असलेल्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला. बॉम्बस्फोटात दहशतवाद्यांची मतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पसरले होते. हा व्हिडीओ 2016चा आहे. हे दहशतवादी सीरियातील ISIS या दहशतवादी संघटनेचे असल्याची माहिती समोर आली आहे. 

Web Title: video terrorist killed in a blast while taking selfie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.