युद्ध झाल्यास इराणला उद्ध्वस्त करू, अमेरिकेनं दिली धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 08:41 PM2019-05-20T20:41:19+5:302019-05-20T20:42:06+5:30

सौदी अरेबियानंतर आता अमेरिकेनं इराणलाही युद्धासंबंधी इशारा दिला आहे.

us president donald trump warned iran if war happens iran will be destroyed | युद्ध झाल्यास इराणला उद्ध्वस्त करू, अमेरिकेनं दिली धमकी 

युद्ध झाल्यास इराणला उद्ध्वस्त करू, अमेरिकेनं दिली धमकी 

Next

वॉशिंग्टनः सौदी अरेबियानंतर आता अमेरिकेनं इराणलाही युद्धासंबंधी इशारा दिला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की, अमेरिकेला युद्ध नको आहे. परंतु इराणनं जर युद्धाची खुमखुमी भरली, तर त्यांना उद्ध्वस्त करू. इराणच्या कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेनं पश्चिम आशिया क्षेत्रात विमानवाहू युद्धनौका आणि बॉम्बफेक करणारी विमानं तैनात केली आहेत. ट्रम्प यांनी हा इशारा इराकची राजधानी बगदादजवळच्या अमेरिकी दूतावासाच्या नजीक एक रॉकेट पडल्याच्या वृत्तानंतर दिला आहे.

ट्रम्प यांनी इराणला धमकी देत सांगितलं आहे की, अमेरिकेच्या सार्वभौमत्वावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना उद्ध्वस्त करू. रविवारी इराकची राजधानी बगदादजवळच्या अतिसुरक्षित भागात रॉकेट डागण्यात आला होता. जिथे सरकारी कार्यालय आणि अमेरिकेसह अनेक देशांचे दूतावास आहेत. परंतु हे रॉकेटचा मारा कोणी केला याचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. अमेरिकी मीडियाच्या माहितीनुसार, ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन इराणवर कडक कारवाई करण्याची भाषा करत आहेत. परंतु अनेक वरिष्ठ अधिकार या कारवाईच्या विरोधात आहेत. 

Web Title: us president donald trump warned iran if war happens iran will be destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.