रशियासोबतच्या संरक्षण करारासाठी अमेरिकेने भारताला दिली मोकळी वाट 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 01:19 PM2018-08-02T13:19:55+5:302018-08-02T13:20:15+5:30

 भारताच्या रशियासोबतच्या संरक्षण करारासाठी अमेरिकेने वाट मोकळी केली आहे.

The United States gave access to India for buying russian arms | रशियासोबतच्या संरक्षण करारासाठी अमेरिकेने भारताला दिली मोकळी वाट 

रशियासोबतच्या संरक्षण करारासाठी अमेरिकेने भारताला दिली मोकळी वाट 

Next

वॉशिंग्टन -  भारताच्यारशियासोबतच्या संरक्षण करारासाठी अमेरिकेने वाट मोकळी केली आहे. अमेरिकेच्या संसदेने राष्ट्रीय संरक्षण विधेयक, 2019 पारित केले आहे, त्यामुळे सीएएसटीएस कायद्यांतर्गत भारतावर कारवाई करून निर्बंध लादण्यात येण्याची शक्यता मावळली आहे. सीएएसटीएस कायद्यांतर्गत अमेरिकारशियाकडून महत्त्वपूर्ण संरक्षण सामुग्री खरेदी करणाऱ्या आपल्या विरोधी देशांवर निर्बंध लादते. 

 अमेरिकन काँग्रेसच्या सिनेटने 2019 या आर्थिक वर्षासाठी जॉन. एस. मॅक्केन नॅशनल डिफेंस ऑथोराइजेशन अॅक्ट (एनटीएए) (संरक्षण विधेयक) 10 विरुद्द 87 मतांनी मंजूर करण्यात आले. यापूर्वी हे विधेयक हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये गेल्याच आठवड्यामध्ये हे विधेयक संमत करण्यात आले होते. आता कायदा बनवण्यासाठी हे विधेयक राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहीसाठी व्हाइट हाऊसमध्ये पाठवण्यात येईल.

 या विधेयकामध्ये सीएएसटीएसएमधील 231 ही तरतूद रद्द करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. व्हाइट हाऊसमधील राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या जोसुआ व्हाइट यांनी सांगितले की, सीएएसटीएसएच्या नव्या  संशोधित तरतुदींना कायदेशीर रूप मिळाल्यानंतर भारताला रशियाकडून  एस-400 मिसाईल प्रणाली खरेदी करणे सोपे होईल. 

 अमेरिका आणि संरक्षण क्षेत्रातील अमेरिकेच्या महत्त्वपूर्ण भागीदार असलेल्या देशांना राष्ट्राध्यक्ष एक विशेष प्रमाणपत्र देऊन सीएएसटीएसएमधील निर्बंधांपासून सूट देऊ शकतील, अशी तरतूद या संरक्षण विधेयकात करण्यात आली आहे.  

Web Title: The United States gave access to India for buying russian arms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.