अकल्पनीय! शास्त्रज्ञांना जमिनीखाली आढळला हिऱ्यांचा "हिमालय" 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 03:42 PM2018-07-19T15:42:18+5:302018-07-19T15:42:58+5:30

पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान रत्नांपैकी एक म्हणजे हिरा. या हिऱ्यांच्या शोधासाठी मानवाने खोलपर्यंत भूगर्भाचा ठाव घेतला आहे. आता अशाच एका शोधादरम्यान शास्रज्ञांना हिऱ्यांचा महाप्रचंड साठा सापडला आहे.

Unimaginable! Scientists found the tons of diamond | अकल्पनीय! शास्त्रज्ञांना जमिनीखाली आढळला हिऱ्यांचा "हिमालय" 

अकल्पनीय! शास्त्रज्ञांना जमिनीखाली आढळला हिऱ्यांचा "हिमालय" 

googlenewsNext

वॉशिंग्टन - पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान रत्नांपैकी एक म्हणजे हिरा. या हिऱ्यांच्या शोधासाठी मानवाने खोलपर्यंत भूगर्भाचा ठाव घेतला आहे. आता अशाच एका शोधादरम्यान शास्रज्ञांना हिऱ्यांचा महाप्रचंड साठा सापडला आहे. जमिनीखाली दहा खर्वांहून हजारपटीने अधिक एवढ्याप्रमाणात असलेल्या या हिऱ्यांच्या साठ्याबाबत जाणल्यानंतर शास्त्रज्ञांचे डोळेच विस्फारले आहेत. 

हा शोध घेणाऱ्या शास्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हिऱ्यांचा हा महाप्रचंड साठा भूपृष्टापासून सुमारे  90 ते 150 मैल (145 ते 240 किमी) खाली दबलेला आहे. आतापर्यंत एवढ्या खोलीवर मनुष्याला पोहोचता आलेले नाही. तसेच एवढे खोल खोदकाम करणेही शक्य झालेले नाही. 

एमआयटीच्या डिपार्टमेंट ऑफ अर्थ, अॅटमसफरिक अँड प्लॅनेटरी सायन्सेस येथे रिसर्च सँटिस्ट असलेले उलरिक फॉल सांगतात,"आपण या हिऱ्यांना बाहेर काढू शकत नाही. पण हा साठा एवढो मोठा आहे की यापूर्वी त्याबाबत कल्पनासुद्धा करण्यात आली नव्हती. 

सेसमित तंत्रज्ञानाच्या मदतीने शास्त्रज्ञ जमिनीमधून ध्वनितरंग कसा प्रवास करतात याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हाच या साठ्याचा शोध लागला. पृथ्वीवरील प्राचीन भूमिगत खडकांमध्ये एक हजारहून अधिक हिरे असावेत, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. मात्र हे हिरे मानवाच्या हाती लागण्याची शक्यता कमीच आहे.  

Web Title: Unimaginable! Scientists found the tons of diamond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.