नोबुको सुमा आणि सेहिको फुजिओका नावाच्या दोन महिलांनी जपानमध्ये तयार केले रिटायरमेंट होम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 05:29 AM2017-10-28T05:29:28+5:302017-10-28T05:29:32+5:30

जपानमधील या घरांना जिक्का होम्स असे म्हणतात. जपानी भाषेत जिक्का होम्सचा अर्थ आहे पॅरेंटस. नोबुको सुमा आणि सेहिको फुजिओका नावाच्या दोन महिलांनी हे अनोखे घर तयार केले आहे.

Two women named Nobuka Suma and Sehiko Fujiyoka made retirement home in Japan | नोबुको सुमा आणि सेहिको फुजिओका नावाच्या दोन महिलांनी जपानमध्ये तयार केले रिटायरमेंट होम

नोबुको सुमा आणि सेहिको फुजिओका नावाच्या दोन महिलांनी जपानमध्ये तयार केले रिटायरमेंट होम

googlenewsNext


जपानमधील या घरांना जिक्का होम्स असे म्हणतात. जपानी भाषेत जिक्का होम्सचा अर्थ आहे पॅरेंटस. नोबुको सुमा आणि सेहिको फुजिओका नावाच्या दोन महिलांनी हे अनोखे घर तयार केले आहे. ६० वर्षे वयाच्या या महिलांनी तयार केलेले हे ड्रीम रिटायरमेंट होम आहे. सुमा सांगतात की, आम्हाला काळजी होती की, भविष्यात आमची देखभाल करणारे कोणी नाही. त्यासाठी आम्ही या घराची निर्मिती केली. जपानच्या पूर्व भागात टोकिओपासून १८५ किमी अंतरावर या घरांची निर्मिती करण्यात आली आहे. पाहायला तर ही जागा परींच्या गावासारखी वाटते. निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या या भागात शुद्ध हवा आहे. ही घरे ज्येष्ठांसाठी असल्याने ग्राऊंड फ्लोअरलाच सर्व सुविधा आहेत. कुठेही जिने नाहीत. २० हजार स्क्वेअर फुटांपेक्षा अधिक मोठी ही जागा अनेकांच्या आकर्षणाचा विषय झाली आहे.

Web Title: Two women named Nobuka Suma and Sehiko Fujiyoka made retirement home in Japan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.