जगभर रुळांवरून म्हणजेच ट्रकवरून गाड्या धावतात, पण रस्त्यांवरून धावते चीनची रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 04:20 AM2017-10-26T04:20:29+5:302017-10-26T04:20:40+5:30

चीनमध्ये सतत वेगवेगळे प्रयोग होत असतात आणि ते यशस्वी होतील, हे पाहण्यावर चिनी लोकांचा भर असतो. जगभर रुळांवरून म्हणजेच ट्रकवरून गाड्या धावतात, हे सर्वांनाच माहीत आहे. रुळांवरून गाडी घसरली, तरच ती खाली येते.

Trains run across the globe from the tracks, but the Chinese railway runs through the streets | जगभर रुळांवरून म्हणजेच ट्रकवरून गाड्या धावतात, पण रस्त्यांवरून धावते चीनची रेल्वे

जगभर रुळांवरून म्हणजेच ट्रकवरून गाड्या धावतात, पण रस्त्यांवरून धावते चीनची रेल्वे

Next

चीनमध्ये सतत वेगवेगळे प्रयोग होत असतात आणि ते यशस्वी होतील, हे पाहण्यावर चिनी लोकांचा भर असतो. जगभर रुळांवरून म्हणजेच ट्रकवरून गाड्या धावतात, हे सर्वांनाच माहीत आहे. रुळांवरून गाडी घसरली, तरच ती खाली येते. अन्यथा ती रुळांवरच धावावी लागते, पण चीनमध्ये आता ट्रॅकशिवाय म्हणजेच थेट रस्त्यांवरून धावणारी ट्रेन आली आहे. ती काल चीनच्या हुनान प्रांतातील झुझोऊ शहरात धावली. ही चाचणी यशस्वी झाली असली तरी ती मार्चपासून नियमितपणे सुरू होईल. आता तिथे थंडीचा हंगाम सुरू होत आहे. या काळात बर्फ पडतो. रस्त्यांवर बर्फ पडल्यास ती चालवण्यात अडचणी येतील, हे लक्षात घेऊ न ग्रीष्म ऋतूत ती सुरू करण्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. ही ट्रेन रस्त्यांवरील अन्य कोणत्याही वाहनांप्रमाणेच धावेल. रस्त्याच्या कडेला त्यासाठी स्टेशन्स बांधण्यात आली आहेत, पण मधूनच रस्ता ओलांडून दुसºया टोकालाही जाऊ शकेल. बससेवा वा ट्रामसेवा यापेक्षा ही ट्रेन अधिक किफायतशीर आहे, असे चीनच्या दैनिकाने म्हटले आहे. या ट्रेनमधून एका वेळी ३00 लोक प्रवास करू शकतील आणि तिचा वेग ताशी ७0 किलोमीटर इतका असेल. लांबडी बस आणि नियमित ट्रेन यांचा संकरित प्रकार म्हणजे ही ट्रेन. झुझोऊ नंतर चीनमधील अन्य शहरांतही ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

Web Title: Trains run across the globe from the tracks, but the Chinese railway runs through the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.