ठळक मुद्देएखाद्याच्या घरी चोरी करायला गेलेले चोर वेगवेगळ्या कारणांनी पकडले गेल्याचे आपण अनेकदा वाचतो. कोणी कशात अडकून पडतो तर कोणी दुखापत होऊन तिथेच चक्कर येऊन पडतो. पण यापेक्षाही एक विनोदी किस्सा घडला आहे

बरमिंघम - एखाद्याच्या घरी चोरी करायला गेलेले चोर वेगवेगळ्या कारणांनी पकडले गेल्याचे आपण अनेकदा वाचतो. कोणी कशात अडकून पडतो तर कोणी दुखापत होऊन तिथेच चक्कर येऊन पडतो. पण यापेक्षाही एक विनोदी किस्सा घडला आहे, इंग्लडमधल्या बरमिंघम शहरात. एका हॉटेलमध्ये चोरी करायला एक चोरटा चक्क खिडकीत तब्बल ७ सात अडकून राहिला. शेवटी तेथे जाणाऱ्या पादचाऱ्यांनी त्याचा आवाज ऐकला आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले.

इंग्लडमधल्या बरमिंघममध्ये एका हॉटेलमध्ये मध्यरात्री एक चोर चोरी करायला गेला. नेहमीप्रमाणे त्याने चोरीसाठी हॉटेलचा मागच्या गेटचा वापर करायचं ठरवलं. मागच्या बाजूने खिडकीतून आत प्रवेश करताना तो तेथेच अडकला. पण तो अशा पद्धतीने अडकला की त्याला तेथून बाहेर पडताच येईना. खिडकीच्या आत त्याचं डोकं आणि खिडकीच्या बाहेर त्याचे पाय लटकत होते. त्यामुळे त्याला उठता येत नव्हतं. ए‌वढच काय तर त्याला हालचालही करता येत नव्हती.

हॉटेलमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न त्याने रात्रीच्या वेळी केला होता, त्यामुळे परिसरात वर्दळही कमी होती. रस्त्यावर माणसंही नव्हती. तो मदतीसाठी हाक मारत होता. मात्र तेथे कोणीच नसल्याने त्याची हाक कोणापर्यंत पोहोचलीच नाही. अशा अवस्थेत तो तब्बल ७ सात होता. शेवटी तेथून जाणाऱ्या एका पादचाऱ्याला त्याच्या ओरडण्याचा आवाज आला. तो ज्याप्रमाणे खिडकीत अडकला होता हे पाहून सुरुवातीला तेथील पादचाऱ्यांना हसूच आवरता आले नाही. मात्र त्याला मदत करायला पाहिजे या हेतूने त्यांनी पोलिसांना बोलावले.

पोलीस तेथे पोहोचल्यावर त्याला बाहेर काढण्यासाठी फायर ब्रिगेडलाही पाचारण करण्यात आले. शेवटी त्याला बाहेर काढण्यात आलं. या घटनेचा फोटो तेथील वेस्ट मिडलँड्स पोलीसांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. चोरी करण्याचा प्रयत्न त्या चोराच्याच अंगलट आल्याने अनेकांनी हा फोटो रिट्वीट करत अनेक विनोद शेअर केले आहे. 

सौजन्य - www.ndtv.com


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.