मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाईंडची राजकीय एन्ट्री; पाकला इस्लामिक देश बनवण्याचं स्वप्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 11:43 AM2023-12-26T11:43:01+5:302023-12-26T11:45:32+5:30

हाफीज मोहम्मद सईद हा मुंबईतील २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे

The son of 26/11 terror attack mastermind Hafiz Mohammed Saeed has officially entered politics in Pakistan | मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाईंडची राजकीय एन्ट्री; पाकला इस्लामिक देश बनवण्याचं स्वप्न

मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाईंडची राजकीय एन्ट्री; पाकला इस्लामिक देश बनवण्याचं स्वप्न

नवी दिल्ली - पाकिस्तानात फेब्रुवारी २०२४ मध्ये निवडणुका होणार आहेत. त्यात पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात दहशतवादी हाफीज सईदचा पक्ष पाकिस्तान मरकजी मुस्लीम लीग मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने देशात प्रत्येक राष्ट्रीय, विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. हाफीजनं त्याचा मुलगा तल्हा सईदलाही उमेदवार बनवलं आहे. तो लाहोरमधून निवडणुकीला उभा आहे. इतकेच नाही तर हाफीजनं पाकिस्तानी जनतेला आकर्षित करण्यासाठी राजकीय अजेंडा समोर आणला आहे. त्यात पार्टीने निवडणुकीत पाकिस्तानला इस्लामिक स्टेट बनवण्याचं स्वप्न दाखवत आहे. परंतु सईच्या आश्वासनाला लोक किती साथ देतील हे निकालानंतर स्पष्ट होईल. परंतु पाकिस्तानात मोठ्या संख्येने शिक्षित युवकांना रोजगार हवा असल्याचे दिसून येते. 

हाफीज मोहम्मद सईद हा मुंबईतील २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. या हल्ल्यात ६ अमेरिकन लोकांसह १६६ नागरिकांचा मृत्यू झाला. अमेरिकेनेही त्याच्या संघटनेला दहशतवादी घोषित केले आहे. यूएसनं त्याच्यावर १ कोटी डॉलरचे बक्षिस ठेवले आहे. सध्या लष्कर ए तैयबाचा संस्थापक हाफीज सईद, जमात उद दावाचे काही नेते २०१९ पासून जेलमध्ये आहेत. दहशतवादी फंडिगसाठी त्याला दोषी ठरवले आहे. आता हाफीद सईदचा मुलगा राजकारणात उतरला आहे. तो लाहोरच्या जागेवरून निवडणुकीच्या मैदानात आहे. पाकिस्तान मरकजी मुस्लीम लीग हा एक राजकीय पक्ष आहे. ज्याचे चिन्ह खुर्ची आहे. पाकिस्तानला इस्लामिक देश बनवण्याचा सईदचा इरादा आहे. 

एका व्हिडिओत PMML चे अध्यक्ष खालिद मसूद सिंधुने म्हटलंय की, आमचा पक्ष बहुतांश राष्ट्रीय, विभागीय विधानसभा जागांवर निवडणूक लढवेल. आम्हाला भ्रष्टाचारासाठी नव्हे तर लोकांची सेवा करण्यासाठी पाकिस्तानला एक इस्लामिक कल्याणकारी राज्य बनवण्यासाठी सत्तेत येण्याची इच्छा आहे असं त्यांनी सांगितले. सिंधुही निवडणुकीत उतरला आहे. ज्याठिकाणी  माजी पंतप्रधान नवाज शरीफ निवडणूक लढवत आहे त्यांच्या मतदारसंघात तो उभा राहणार आहे. लाहौर NA 130 जागेवर नवाज आणि खालिद यांच्यात लढत होईल. परंतु सिंधुने सईदच्या दहशतवादी संघटनेशी आपला काही संबंध नाही असा दावा केला आहे. याआधीही मिल्ली मुस्लीम लीग २०१८ च्या निवडणुकीत उतरली होती. त्यांनी बहुतांश जागा विशेषत: पंजाब प्रांतातून उमेदवार उतरवले होते. परंतु एकही जागा जिंकण्यास त्यांना अपयश आले. २०२४ च्या निवडणुकीत MML वर प्रतिबंध आल्यानंतर PMML या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली.  
 

Web Title: The son of 26/11 terror attack mastermind Hafiz Mohammed Saeed has officially entered politics in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.