कंपनीची मालकीण झाली उदार; कर्मचाऱ्यांना दिला ८ लाख बोनस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 08:24 AM2022-07-29T08:24:01+5:302022-07-29T08:24:42+5:30

माझ्या प्रत्येक कर्मचाऱ्याने या क्षणाचा पुरेपूर आनंद घ्यावा आणि आयुष्यभर याच्या आठवणी जपून ठेवाव्यात

The owner of the company was generous; 8 lakh bonus given to employees | कंपनीची मालकीण झाली उदार; कर्मचाऱ्यांना दिला ८ लाख बोनस

कंपनीची मालकीण झाली उदार; कर्मचाऱ्यांना दिला ८ लाख बोनस

googlenewsNext

न्यूयाॅर्क : काही बॉस असे असतात की ते कर्मचाऱ्यांना अपेक्षा नसतानाही आश्चर्यचकित करणारी भेट देतात. अशीच एक भेट अमेरिकेतील एका बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना दिली असून, कर्मचारी मालामाल झाले आहेत. यामुळे या बॉसला जगातील सर्वोत्तम बॉस म्हटले जात आहे. 

माझ्या प्रत्येक कर्मचाऱ्याने या क्षणाचा पुरेपूर आनंद घ्यावा आणि आयुष्यभर याच्या आठवणी जपून ठेवाव्यात. अविश्वसनीय २१ वर्षे पूर्ण केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन, असे स्पॅनक्स कंपनीच्या सारा ब्लेकली यांनी म्हटले आहे. 

कोण आहेत ‘त्या’ उद्योगपती?
अमेरिकेत स्पॅनक्स नावाची अंडरगारमेंट कंपनी चालवणारी सारा ब्लेकली यांनी कर्मचाऱ्यांना ही भेट दिली. तुम्ही कंपनीला इतक्या उच्च स्तरावर नेले म्हणून ही छोटीशी भेट असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले.

८ लाख अन् मोफत टूर 
सारा यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला  सुमारे ८ लाख रुपये बोनस म्हणून दिले आहेत. इतकेच नाही तर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दोन प्रथम श्रेणी विमानाची तिकिटेही दिली आहेत, जेणेकरून ते जगात पर्यटनासाठी कुठेही जाऊ शकतील.

कर्मचारीही खूश 
सारा ब्लेकलीची कंपनी १.२ अब्ज अमेरिकन डॉलर्स मूल्यांची झाली आहे. या यशाची भेट म्हणून त्यांनी  बोनसची घोषणा केली.  त्यांनी इन्स्टाग्रामवरही ही माहिती दिली आहे. या प्रचंड यशाबद्दल मी कर्मचाऱ्यांवर अतिशय आनंदी असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

Web Title: The owner of the company was generous; 8 lakh bonus given to employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.