अन्नपाण्यासाठी संघर्ष; ३ लाख लोकांचे स्थलांतर; संयुक्त राष्ट्राकडून चिंता; इस्रायलचा गाझावर हल्ला तीव्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 07:54 AM2023-10-13T07:54:47+5:302023-10-13T07:55:09+5:30

जीवाच्या भीतीने जवळपास ३ लाख नागरिकांनी गाझातून स्थलांतर केल्याचे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे.

struggle for food and water; Migration of 3 lakh people; Concerns from the United Nations; Israel's attack on Gaza intensified | अन्नपाण्यासाठी संघर्ष; ३ लाख लोकांचे स्थलांतर; संयुक्त राष्ट्राकडून चिंता; इस्रायलचा गाझावर हल्ला तीव्र 

अन्नपाण्यासाठी संघर्ष; ३ लाख लोकांचे स्थलांतर; संयुक्त राष्ट्राकडून चिंता; इस्रायलचा गाझावर हल्ला तीव्र 

जेरूसलेम : हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलकडून गाझापट्टीवर जोरदार हल्ले केले जात आहे. पॅलेस्टाइनला धडा शिकविण्यासाठी इस्रायलने नाकाबंदी केली असून त्यामुळे गाझामध्ये वीज, अन्नधान्य, जेवण, पाण्यासह जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा जाणवत आहे. त्यासाठी लोकांच्या रांगा लागत आहे. जीवाच्या भीतीने जवळपास ३ लाख नागरिकांनी गाझातून स्थलांतर केल्याचे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे.

हमासच्या दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी इस्रायलमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांनी अनेक वर्षांचा कटू संघर्ष विसरून ऐक्य सरकार स्थापन करून नेतन्याहू यांना पाठिंबा दिला आहे. केवळ युद्धाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या मंत्रिमंडळाचे नेतृत्व नेतन्याहू करतील.

१५ मुलींना एकत्र कोंडले अन्...
हमासच्या दहशतवाद्यांनी लोकांचे गळे कापले, मुलांना रांगेत उभे करून ठार मारले आणि १५ मुलींना एका खोलीत बंद करून तेथे ग्रेनेड फेकल्याचे इस्रायलचे मेजर जनरल इताई वेरूव यांनी सांगितले. 

सहाव्या दिवशी काय घडले?
- इस्रायलला राफाह येथून मदत आणि इंधनपुरवठ्याची रसद जाऊ देण्यासाठी इजिप्तची इस्रायल आणि अमेरिकेशी चर्चा झाली. तथापि, गाझाबाहेर कॉरिडॉर स्थापन करण्याच्या प्रस्तावांना इजिप्तने नकार दिला आहे.
- मलेशियाचे परराष्ट्रमंत्री झांब्री अब्दुल कादिर यांनी इस्रायलच्या प्रतिहल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि पॅलेस्टिनींना २.१२ लाख डॉलरची मदत जाहीर केली.
- ‘एक्स’ प्लॅटफॉर्मवर हमासशी संबंधित शेकडो खाती बंद करण्यात आली आहेत.

बायडेन यांच्यामुळे युद्ध
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या परराष्ट्र धोरणांमुळे जग युद्ध पाहत आहे, ज्यात आतापर्यंत २३०० बळी गेले आहेत. बायडेन प्रशासनानेच हमासचा समर्थक असलेल्या इराणची सुमारे ६ अब्ज डॉलर्सची गोठवलेली मालमत्ता मुक्त केली.
    - डोनाल्ड ट्रम्प, माजी राष्ट्राध्यक्ष, अमेरिका

हमासचा हल्ला सर्वांत प्राणघातक
हमासचा इस्रायलवरील दहशतवादी हल्ला होलोकॉस्टनंतर ज्यूंसाठी ‘सर्वांत प्राणघातक दिवस’ आहे. अमेरिका इस्रायलमधील परिस्थितीवर सतत बारकाईने लक्ष ठेवून आहे. हमाससारखे दहशतवादी गट जगासमोर केवळ दहशतच आणत नाहीत, तर केवळ वाईट गोष्टी आणतात. 
    - जो बायडेन, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका

Web Title: struggle for food and water; Migration of 3 lakh people; Concerns from the United Nations; Israel's attack on Gaza intensified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.