विमान पाडल्याच्या शंकेला बळकटी

By admin | Published: March 29, 2015 01:38 AM2015-03-29T01:38:08+5:302015-03-29T01:38:08+5:30

फ्रान्समधील विमान अपघात सहवैमानिकाने जाणीवपूर्वक घडवून आणल्याच्या शंकेला बळकटी देणाऱ्या बाबी समोर आल्या आहेत.

Strong fears of flying aircraft | विमान पाडल्याच्या शंकेला बळकटी

विमान पाडल्याच्या शंकेला बळकटी

Next

बर्लिन : फ्रान्समधील विमान अपघात सहवैमानिकाने जाणीवपूर्वक घडवून आणल्याच्या शंकेला बळकटी देणाऱ्या बाबी समोर आल्या आहेत. या वैमानिकाने प्रेयसीशी बोलताना ‘एक दिवस माझे नाव सर्वांना माहीत होईल’, असे म्हणून सूचकपणे भावी कृत्याचे संकेत दिले होते तसेच त्याने उड्डयन कंपनी आणि सहकाऱ्यांपासून त्याचा आजारही लपवला होता. या दोन्ही गोष्टी मंगळवारचे विमान कोसळणे हा अपघात नव्हे तर घातपाती कृत्य असल्यास पुष्टी देतात.
जर्मन विंग्जचे ए-३२० हे विमान आल्प्स पर्वतराजीत कोसळून १५० प्रवासी ठार झाले होते. कॅप्टन कॉकपिटमधून बाहेर आल्यानंतर सहवैमानिक अँड्रियाज ल्युबित्झने कॉकपिटचे दार आतून लावून घेत विमान ३,००० फूट प्रतिमिनिट एवढ्या वेगाने खाली आणून आल्प्स पर्वतराजीत कोसळवले, असे संकेत कॉकपिट व्हाईस रेकॉर्डरमधील संभाषणातून प्राप्त झाले होते.
त्यामुळे फ्रेंच अधिकाऱ्यांनी दहशतवादाकडे अंगुलीनिर्देश केला होता. त्यानंतर जर्मन पोलिसांनी सहवैमानिक अँड्रियाज ल्युबित्झ याच्या घराची झडती घेतली. तेव्हा त्याला कसलातरी आजार असल्याचे दर्शविणारी कागदपत्रे सापडली. ही कागदपत्रे फाटलेल्या अवस्थेत आहेत. थोडक्यात, अँड्रियाजने त्याच्या आजारपणाची माहिती विमान कंपनी व आपल्या सहकाऱ्यांपासून दडवून ठेवल्याचे स्पष्ट झाले. (वृत्तसंस्था)
जर्मन पोलिसांनी अँड्रियाज याचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून त्याच्या घराची झडती घेतली होती. मात्र, दुसरीच माहिती समोर आली.
(वृत्तसंस्था)


४एक दिवस मी असे काही करीन की त्यामुळे संपूर्ण यंत्रणा बदलून जाईल व प्रत्येकाला माझे नाव माहीत होईल, असे अँड्रियाज माझ्याशी बोलताना म्हणाला होता, असे त्याच्या माजी प्रेयसीने सांगितले.
४ अँड्रियाजची माजी प्रेयसी फ्लाईट अटेंडंट असून तिने गेल्यावर्षी पाच महिने अँड्रियाजसोबत काम केले होते. विमान अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मला धक्का बसला तसेच अँड्रियाज जे बोलला होता त्याची आठवण झाली, असे तिने सांगितले.

 

Web Title: Strong fears of flying aircraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.