टेक्सास - डेल कॉम्प्युटर बनविणा-या डेल टेक्नॉलॉजीचे सीईओ माइकल डेल यांची मुलगी अलेक्सा डेल आणि जगातील 37 क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीचे चिरंजीव हॅरिसन यांच्या एंगेजमेंटची सद्या बरीच चर्चा सुरु आहे. हॅरिसनने या राजकुमारीला तब्बल 19.5 कोटी रुपयांची अंगठी दिली आहे. यात 12 कॅरेटचा अतिशय सुंदर हीरा आहे. माइकल डेल यांची एकूण संपत्ती 1.53 लाख कोटी रुपये आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचे नाव आहे. 

अलेक्सा ही एका स्टार्टअप कंपनीत काम करते. अलेक्सा ही आपल्या आई - वडीलांच्या चॅरिटी संस्थेचेही काम पाहते. अलीकडेच या कंपनीने टेक्सासच्या एका कार्यक्रमात ३६ मिलियन डॉलर दान केले होते. अलेक्साला अतिशय श्रीमंतीत आणि मौजमजेत आयुष्य जगण्याची सवय आहे. त्यामुळे साहजिकच तिला एंगेजमेंटची खास भेट मिळणारच होती. पण, ही भेट एवढी महागडी असेल याची कुणाला कल्पना नव्हती. तर, हॅरिसन यांना अतिशय साधी राहणी आवडते. या दोघांनी अंगठीसह आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

अलेक्सा एखाद्या राजकुमारी सारखं आयुष्य जगत आहे. टेक्सासमध्ये 33 हजार चौ. फूटमध्ये असलेल्या घरात राहते. तिचे घर महालापेक्षे कमी नाही. अलेक्सानं आपलं शिक्षण अमेरिकातील कोलंबिया विद्यापिठातून पूर्ण केलं आहे.  लवकरच ती हॅरिसन याच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. इनस्टाग्रामवर त्यांच्या दोघांचे फोटो सध्या धुमाकूळ घालत आहेत.