शाहिद अफ्रिदी म्हणतो 'पाकिस्तान शांतताप्रिय देश, चर्चा करुन प्रश्न सोडवा'

By Admin | Published: September 30, 2016 12:08 PM2016-09-30T12:08:38+5:302016-09-30T12:08:38+5:30

ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया देणा-या शाहिदने भारत आणि पाकिस्तानने एकमेकांविरुद्ध युद्ध पुकारु नये असं आवाहन केलं आहे

Shahid Afridi says 'peace with Pakistan, discuss and resolve questions' | शाहिद अफ्रिदी म्हणतो 'पाकिस्तान शांतताप्रिय देश, चर्चा करुन प्रश्न सोडवा'

शाहिद अफ्रिदी म्हणतो 'पाकिस्तान शांतताप्रिय देश, चर्चा करुन प्रश्न सोडवा'

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर एकीकडे भारतामध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण असताना पाकिस्तानमध्ये मात्र तणाव आहे. भारतीय लष्कर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं  सर्व राजकीय नेते, बॉलिवूड कलाकार, खेळाडू कौतुक करत असताना पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद अफ्रिदीनेदेखील प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया देणा-या शाहिदने भारत आणि पाकिस्तानने एकमेकांविरुद्ध युद्ध पुकारु नये असं आवाहन केलं आहे. 
 
सीमोल्लंघन!
भारत आता पाकसोबत हवाई संपर्कही तोडणार?
 
'पाकिस्तान शांतताप्रिय देश आहे. ज्या गोष्टींवर चर्चा केली जाऊ शकते त्यासाठी एवढं मोठं पाऊल उचलण्याची गरज काय? पाकिस्तानला सगळ्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे आहेत. जेव्हा दोन शेजारी देश भांडतात, तेव्हा दोन्ही देशांचं नुकसान होतं', असं ट्विट शाहिद अफ्रिदीने केलं आहे. 
 
सीमेवर युद्धसज्जता!
सर्जिकल स्ट्राइक आणि लाँच पॅड्स म्हणजे नेमके काय?
 
उरी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर पाकिस्तानची विविध मार्गांनी कोंडी केल्यानंतर भारताने बुधवारी मध्यरात्री जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करुन 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला. हेलिकॉप्टरच्या मदतीने लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे सात लाँच पॅड उद्ध्वस्त केले. त्यात पाकचे 9 सैनिकही ठार झाल्याचे सांगण्यात येत असले तरी पाकने दोनच सैनिक मारले गेल्याचे म्हटले आहे. 
 

Web Title: Shahid Afridi says 'peace with Pakistan, discuss and resolve questions'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.