मगरीसोबतचा सेल्फी महागात

By admin | Published: January 3, 2017 04:05 AM2017-01-03T04:05:52+5:302017-01-03T04:05:52+5:30

मगरीसोबत सेल्फी घेण्यासाठी धडपड करणाऱ्या एका महिलेला मगरीने चावा घेतल्याची घटना थायलंडच्या खाओ याई नॅशनल पार्कमध्ये घडली.

Selfie with the Crocodile | मगरीसोबतचा सेल्फी महागात

मगरीसोबतचा सेल्फी महागात

Next

बँकॉक : मगरीसोबत सेल्फी घेण्यासाठी धडपड करणाऱ्या एका महिलेला मगरीने चावा घेतल्याची घटना थायलंडच्या खाओ याई नॅशनल पार्कमध्ये घडली.
म्युरिअल बिनिटुलिअर (४१) या फ्रान्सच्या महिलेला मगरीसोबत सेल्फी घ्यायचा होता. ही महिला मगरीच्या शेजारी बसली आणि सेल्फी घेतला; पण ती उठून उभी राहत असताना अचानक एका बाजूला कलली. इतक्यात या मगरीने तिच्या डाव्या पायाला चावा घेतला, अशी माहिती या पार्क मधील अधिकाऱ्यांनी दिली. मगरीने चावा घेतल्याने पायाला गंभीर इजा झाली आहे. म्युरिअल बिनिटुलिअर या आपल्या पतीसोबत त्या पार्कमध्ये आल्या होत्या. दरम्यान, या घटनेनंतर म्युरिअल यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Selfie with the Crocodile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.