रशियाच्या स्पेस सेंटरमध्ये छिद्र; पूर्वनियोजित कट?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 01:02 PM2018-09-05T13:02:52+5:302018-09-05T13:04:21+5:30

रशियाच्या अंतराळ एजन्सीचे नाव रॉसकॉसमोस असे आहे. त्याचे महासंचालक दमित्रि रोगोजिन यांनी या घटनेबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

Russia: Hole in space station was likely act of sabotage | रशियाच्या स्पेस सेंटरमध्ये छिद्र; पूर्वनियोजित कट?

रशियाच्या स्पेस सेंटरमध्ये छिद्र; पूर्वनियोजित कट?

Next

मॉस्को- अमेरिका आणि रशिया यांच्यामुळे शीतयुद्धाच्या काळात वेगवेगळ्या घातपाताच्या घटना घडल्या होत्या. या घटना केवळ या दोन देशांमध्य़ेच नव्हे तर त्यांच्या शेजारी देशांत किंवा इतर देशांमध्येही घडत असत. जगभरातील अनेक देश या शीतयुद्धाच्या काळामध्ये भरडले गेले. त्यांची अर्थव्यवस्थाही या बलाढ्य महासत्तांच्या लहरींवर अवलंबून होती. मात्र त्यानंतर गेली काही वर्षे यामध्ये खंड पडल्याचे चित्र निर्माण झाले. आता पुन्हा त्यांना सुरुवात झाली असावी अशी शंका आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
रशियाचे अंतराळस्थानकातून हवेची गळती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या स्पेसस्टेशनमध्ये मुद्दाम छिद्र पाडल्याची शंका रशियन अंतराळ एजन्सीच्या प्रमुखांनी व्यक्त केली आहे.



रशियाच्या अंतराळ एजन्सीचे नाव रॉसकॉसमोस असे आहे. त्याचे महासंचालक दमित्रि रोगोजिन यांनी या घटनेबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. हे छिद्र कोणीतरी मुद्दाम पाडले असावे अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. या घटनेची आता पूर्ण तपासणी व चौकशी करण्य़ात  येणार आहे. सोमवारी रोगोजिन यांनी माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले. ड्रिलिंग करण्याचे अनेक प्रयत्न झाले असून ते कोणी मुद्दाम केले की स्पेसस्टेशन बांधताना काही कमतरता राहिली याबाबत शोध सुरु आहे, असे ते म्हेहणाले.  छिद्र बुजवण्यासाठी रशियन अंतराळ यात्रींना भरपूर प्रयत्न करावे लागले. या छिद्रामुळे अंतराळस्थानकातून अंतराळात हवेची गळती होत होती.

Web Title: Russia: Hole in space station was likely act of sabotage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :russiaरशिया