भारतात अयोध्या अन् थायलंडमध्ये अयुथ्या...दोन्हीकडेही रामनामाचा जयघोष, काय आहे संबंध?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 05:34 PM2024-01-22T17:34:50+5:302024-01-22T17:40:17+5:30

भारतातील अयोध्या आणि थायलंडमधील अयुथ्यामध्ये काही समानताही आढळून येतात. ज्याप्रमाणे अयोध्या शहर शरयू नदीच्या किनारी वसलेलं आहे, तसंच अयुथ्या शहराच्या आजूबाजूलाही तीन नद्या आहेत. 

Ram mandir what is the connection between Ayodhya in India and Ayutthaya in Thailand | भारतात अयोध्या अन् थायलंडमध्ये अयुथ्या...दोन्हीकडेही रामनामाचा जयघोष, काय आहे संबंध?

भारतात अयोध्या अन् थायलंडमध्ये अयुथ्या...दोन्हीकडेही रामनामाचा जयघोष, काय आहे संबंध?

Ram Mandir Ayodhya ( Marathi News ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत अयोध्येत आज रामललांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात आज भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं. मोठ-मोठ्या शहरांपासून अगदी गावखेड्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. अयोध्येतील या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची देशासह जगभरात चर्चा रंगत असताना थायलंड येथीलही अयोध्येसारखंच नाव असलेलं एक ऐतिहासिक शहर चर्चेत आलं आहे.

थायलंड येथील अयुथ्या हे शहर १३५० मध्ये वसवण्यात आलं होतं. हे शहर कधीकाळी एका विशाल साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखलं जात. अयुथ्या शहर हे  बँकॉकपासून ७० किलीमीटर अंतरावर आहे. भारतातील अयोध्या आणि थायलंडमधील अयुथ्यामध्ये काही समानताही आढळून येतात. ज्याप्रमाणे अयोध्या शहर शरयू नदीच्या किनारी वसलेलं आहे, तसंच अयुथ्या शहराच्या आजूबाजूलाही तीन नद्या आहेत. 
 
भारताच्या प्राचीन संस्कृतीचा दक्षिण पूर्व आशियावर मोठा प्रभाव असल्याचं पाहायला मिळतं. असं म्हटलं जातं की, जेव्हा अयुथ्याची स्थापना झाली तेव्हा रामामण थायलंडपर्यंत पोहोचलं होतं. थायलंडमध्ये रामायण हे रमाकिएन नावानं ओळखलं जातं. थायलंडचे लोक राजाला भगवान विष्णूचा अवतार मानतात. त्यामुळेच तिथं राजाला रामा-१, रामा-२ अशा नावाने ओळखलं जातं. थायलंडमध्ये संस्कृतसह पाली भाषेचाही प्रभाव पाहायला मिळतो. 

दरम्यान, भारत आणि थायलंडच्या आंतरराष्ट्रीय संबंधांना ७७ वर्ष पूर्ण होत असली तरी या दोन देशांमध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध मात्र अनेक शतकांचे आहेत. १४ व्या शतकापासून १८ व्या शतकापर्यंत अयुथ्या हे एक समृद्ध शहर म्हणून ओळखलं जात होतं. मात्र १७६७ मध्ये बर्माने या शहरावर हल्ला केला होता. या हल्ल्यात अयुथ्या शहर उद्धवस्त झालं. परिणामी या शहरात अनेक मूर्ती आणि इमारतीचा सांगाडा आज पाहायला मिळतो.

Web Title: Ram mandir what is the connection between Ayodhya in India and Ayutthaya in Thailand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.