अन् अमेरिकेचा जीव भांड्यात पडला, रॅकूनच्या थरारक चढाईमुळे थांबला देश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 12:11 PM2018-06-14T12:11:16+5:302018-06-14T12:11:16+5:30

रॅकून हा मध्यम आकाराचा एक प्राणी असतो. तो अमेरिका युरोप आणि जपानमध्ये आढळतो.

Raccoon conquers skyscraper; Americans breathe easier | अन् अमेरिकेचा जीव भांड्यात पडला, रॅकूनच्या थरारक चढाईमुळे थांबला देश

अन् अमेरिकेचा जीव भांड्यात पडला, रॅकूनच्या थरारक चढाईमुळे थांबला देश

googlenewsNext

वॉशिंग्टन- एखादा लहानसा प्राणी संपूर्ण देशाचे फक्त लक्षच वेधून घेऊ शकतो असे नाही तर सर्व देशाचा जीव टांगणीला लावू शकतो याचा प्रत्यय अमेरिकन नागरिकांना नुकताच आला. रॅकून या लहानशा प्राण्याने मिनिसोटा राज्यातील एका उंच इमारतीवर चढाई करायला सुरुवात केली आणि हा रॅकून आता वरुन पडेल याची भीती सगळ्या अमेरिकेला वाटू लागली. त्याला वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. बऱ्याच अवधीनंतर त्याला उतरवण्यात यश आल्या नंतर सगळ्या अमेरिकेचा अडकलेला जीव मोकळा झाला.

 रॅकून हा मांजराहून थोड्या मोठ्या आकाराचा प्राणी असतो. एका रॅकूनने मिनिसोटा राज्यातील सेंट पॉल शहरातील यूबीएस प्लाझाच्या उंच भिंतीवर अचानक चढाई सुरु केली. थोड्याचवेळात हा संपूर्ण अमेरिकेत हा चर्चेचा विषय झाला. इंचा-इंचाने पुढे सरकणाऱ्या या रॅकूनमुळे अमेरिकन लोकांनी हातातली कामं टाकून टीव्ही, रेडिओ, ट्वीटरसमोर ठाण मांडले. ट्वीटरवर त्याच्या नावाने हॅशटॅगही सुरु झाला. रॅकूनचे प्राण वाचवावेत यासाठी धावा सुरु झाला तर काही लोकांनी त्याला कसे वाचवावे याचे उपायही सुचवले. पण रॅकून मात्र एकेक पाऊल वर सरकतच राहिला.




हॉलिवूड अभिनेता जेम्स गन याने तर जो रॅकूनचे प्राण वाचवेल त्याला 1 हजार डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले. रॅकून मध्येच थांबायचा, थबकायचा. त्यामुळे लोकांना वाटायचं आता हा दमला असणार आता तो खाली पडणार. पण लोकांची अशी परिक्षा बघून रॅकून पुन्हा पावलं टाकायला लागायचा.



अखेर मध्यरात्रीस रॅकूनने सगळी चढाई पूर्ण केली आणि तो छतावर पोहोचला. त्याला वन्यजीव नियंत्रण विभागाने पकडून पिंजऱ्यामध्ये बंदिस्त केले.  यूएसबी इमारतीच्या व्यवस्थापकांनी नंतर रॅकूनचे चित्र ट्वीट केले आणि लिहिले, 'कॅटफूडची मेजवानी दिल्यानंतर रॅकूनला पकडण्यात आले आहे.'

Web Title: Raccoon conquers skyscraper; Americans breathe easier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.