2 एप्रिलपासून सुरू होणार एच1-बी व्हिसासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 01:44 PM2018-03-21T13:44:14+5:302018-03-21T13:44:14+5:30

अमेरिकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एच1-बी  व्हिसा महत्त्वाचा असतो. अशा व्यक्तींसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. अमेरिकेत नोकरी करण्यासाठी आवश्यक असलेल्या एच1-बी  व्हिसाचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया

 The process of filing of an application for H1-B visa starting on 2 April | 2 एप्रिलपासून सुरू होणार एच1-बी व्हिसासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 

2 एप्रिलपासून सुरू होणार एच1-बी व्हिसासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 

Next

वॉशिंग्टन - अमेरिकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एच1-बी  व्हिसा महत्त्वाचा असतो. अशा व्यक्तींसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. अमेरिकेत नोकरी करण्यासाठी आवश्यक असलेल्या एच1-बी  व्हिसाचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 2 एप्रिल पासून स्वीकारण्यात येणार आहेत. मंगळवारी अमेरिकन सरकारसीं संबंधित एजन्सी यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस (यूएससीआयएस) यासंदर्भातील घोषणा केली आहे. विशेष गोष्ट म्हणजे यावेळी एजन्सीने सर्व एच1-बी व्हिसा अर्जांसाठीची प्रीमियम प्रोसेसिंग स्थगित करण्यात आली आहे. 
एच1-बी व्हिसा हा अमेरिकन कंपन्यांना त्यांच्या व्यवसायासाठी परदेशी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची परवानगी देतो. अमेरिकेमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या ह्या भारत आणि चीनमधून येणाऱ्या त ज्ज्ञ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी एच1-बी व्हिसावर अवलंबून असतात.  
एच1-बी व्हिसा अर्ज करण्याची नवी घोषणा ही 1 ऑक्टोबर 2018 पासून सुरू होणाऱ्या नव्या अमेरिकन आर्थिक वर्षासाठी करण्यात आली आहे. सर्व एच1-बी अर्जांवरील प्रीमियम प्रोसेसिंगवरील स्थगिती 10 सप्टेंबर 2018 पर्यंत संपुष्टात येण्याची शक्यता आहे. यूएससीआयएसने सांगितले की यादरम्यान ते त्या एच1-बी  अर्जांच्या प्रीमियम प्रोसेसिंगच्या कार्यवाहीला स्वीकार करत राहील, जे 2019च्या आर्थिक वर्षासाठी वरील मर्यादेपासून मुक्त असतील. 
यूएससीआयएसचे म्हणणे आहे की, प्रीमियम प्रोसेसिंगला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. पण जर कुणी अर्जदार आवश्यक अटींची पूर्तता करत असेल तर तो 2019 च्या आर्थिक वर्षासाठी आपल्या अर्जाच्या प्रक्रियेला गती देण्याचा आग्रह करू शकतो. प्रीमियम प्रोसेसिंगला अस्थायी स्थगिती दिल्याने एच-1बी प्रोसेसिंगची एकूण वेळ कमी होण्यास मदत होणार आहे.  

Web Title:  The process of filing of an application for H1-B visa starting on 2 April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.