युद्धासाठी आमचे सैनिक तयार - पाक पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2017 02:31 PM2017-04-11T14:31:28+5:302017-04-11T15:53:03+5:30

भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना सोमवारी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर पाक पंतप्रधान नवाज शरिफ यांनी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

Prepare our troops for war - Pak Prime Minister | युद्धासाठी आमचे सैनिक तयार - पाक पंतप्रधान

युद्धासाठी आमचे सैनिक तयार - पाक पंतप्रधान

Next

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 11 - भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना सोमवारी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर पाक पंतप्रधान नवाज शरिफ यांनी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. नवाज शरिफ म्हणाले, आमचा देश शांतीपूर्ण आहे. शेजारील देशांशी आम्ही मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. जर आमच्यावर कोणत्याही प्रकारचे संकट आल्यास आमचे सैनिक युद्धासाठी तयार आहेत. नवाज शरिफ पाकमधील नौदलाच्या कार्यक्रमात बोलत होते.
पाक सैनिक सर्व प्रकारच्या आडचणीचा सामना करण्यासाठी तत्पर आहे. कोणतेही संकट आल्यास ते माघारी लावू शकतो. पाक नेहमी शेजारील देशाशी शांती आणि मैत्रीद्वारे संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पुढे बोलताना शरिफ म्हणाले, शेजारील देशासोबत आम्ही सतत मैत्रीचा हात पुढे करत असतो. पण शांतीप्रमाणे आम्हाला आमच्या देशाच्या सुरक्षेचाही विचार करवा लागतोय. दहशतावादाविरोधातील सुरु असलेल्या लढाईवर बोलताना ते म्हणाले, दहशतवाद्यांच्या विरोधात कडक कारवाई सुरु आहे त्यामध्ये खुप सुधारणा झालेली आहे.
पाकिस्तानमधील इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र असलेल्या द नेशननं पहिल्या पानावर "हेरगिरी करण्यासाठी मृत्यू" ही शिक्षा असल्याचं छापलं आहे. राजकीय आणि संरक्षण विश्लेषक डॉ. हसन अन्सारी यांच्यामते, या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील तणावामध्ये वाढ होणार असून, पाकिस्ताननं या गुन्ह्यासाठी गंभीर शिक्षा दिल्याचंही द नेशननं त्यामध्ये म्हटलं आहे.

"आउट ऑफ द वे" जाऊन कुलभूषण यांना वाचवू - स्वराज
कुलभूषण जाधव भारताचा मुलगा आहे. त्यांनी हेरगिरी केल्याचा पाकिस्तानकडे कोणताही पुरावा नाही. काहीही करुण कुलभूषण यांना सरकार वाचवेल अशी ग्वाही परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिली. कुलभूषण सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा हा सुनियोजित कट आहे. पण आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही. काहीही करू, "आउट ऑफ द वे" जाऊन सरकार कुलभूषण यांना वाचवेल अशी भूमिका स्वराज यांनी मांडली.

कुलभूषण जाधव यांना न्याय मिळावा यासाठी भारत सर्व प्रयत्न करणार आहे, त्यांच्याकडे भारताचा अधिकृत व्हिसा असताना त्यांच्यावर हेर असल्याचा शिक्का का? कुलभूषण यांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा असून त्यांना न्याय देण्यासाठी जे करावं लागेल ते सर्व केलं जाईल, असा शब्द केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिला.

कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवणं गरजेचं- ओवैसी
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवणं गरजेचं असल्याचं मत लोकसभेत एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मांडलं आहे. कुलभूषण यांच्या बचावासाठी मोदी सरकारनं स्वतःची सर्व शक्ती पणाला लावण्याची गरज आहे. कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणा, असंही ते म्हणाले आहेत.

Web Title: Prepare our troops for war - Pak Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.