ठळक मुद्दे रशियामध्ये पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमध्ये व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात एका पॉर्नस्टारने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर पश्चिम रशियाची एलिना बर्कोवा या पॉर्नस्टारने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट करून निवडणूक लढविण्याच्या तिच्या योजनेबद्दल सांगितलं.

मॉस्को- रशियामध्ये पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमध्ये व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात एका पॉर्नस्टारने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर पश्चिम रशियाची एलिना बर्कोवा या पॉर्नस्टारने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट करून निवडणूक लढविण्याच्या तिच्या योजनेबद्दल सांगितलं.

लैंगिक शोषण करणाऱ्यांना मृत्यू दंडाची शिक्षा द्यायची आहे, असं एलिनाने म्हंटलं आहे. तसंच 40 सेंटीमीटरपेक्षा जास्त लांब स्कर्टवरही तिला बंदी आणायची आहे. सिनेसृष्टीत असलेल्या हार्वे वाइनस्टीनसारख्या लोकांना कंटाळल्याने लैंगिक शोषण करणाऱ्यांना मृत्यू दंडाची शिक्षा देण्याचा नियम करणार असल्याचं एलिनाचं म्हणणं आहे. 

पुरूषाला त्याच्या साथीदाराशी घटस्फोट घेणं अशक्य करणार असून मुलांना शाळेत सेक्स एज्युकेशन देणार असल्याचं एलिनाने पुढे म्हंटलं. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत महिलांची सक्रियता बघून आपणही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचं, एलिनाने शेअर केलेल्या व्हिडीओत म्हंटलं आहे. 

मी सोचीची मेयर पदाची निवडणूक लढून राजकारणात प्रवेश केला होता. म्हणूनच आता रशियाच्या राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पुरूषांसाठी घटस्फोटाची प्रक्रिया मला अशक्य करायची आहे. मुलांना शाळेत सेक्स एज्युकेशन द्यायचं असून त्याविषयावर मुलांची परीक्षाही घेण्याचं नियोजन आहे. बऱ्याच तरूणांना सरकारी प्रक्रिया, स्वच्छतासारख्या गोष्टींची माहिती नसते, त्याबद्दल जागृकता निर्माण करायची असल्याचं एलिनाने म्हंटलं आहे. 

रशियाच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीला उभी राहणारी एलिना बर्कोवा ही चौथी महिला असेल.