मालकाची भेट, ६ हजार कर्मचा-यांना घडवली फ्रान्सची सैर

By admin | Published: May 11, 2015 09:15 AM2015-05-11T09:15:03+5:302015-05-11T09:15:15+5:30

चीनमधील टायन्स ग्रुप या कंपनीच्या मालकाने आपल्या सहा हजारहून अधिक कर्मचा-यांना सुट्टीत फ्रान्सची सैर घडवली आहे.

The owner's gift, to 6,000 employees, was made to visit France | मालकाची भेट, ६ हजार कर्मचा-यांना घडवली फ्रान्सची सैर

मालकाची भेट, ६ हजार कर्मचा-यांना घडवली फ्रान्सची सैर

Next
>ऑनलाइन लोकमत 
पॅरिस, दि. ११ - चीनमधील टायन्स ग्रुप या कंपनीच्या मालकाने आपल्या सहा हजारहून अधिक कर्मचा-यांना सुट्टीत फ्रान्सची सैर घडवली आहे. कंपनीच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त मालकाने त्याच्या कर्मचा-यांना ही अविस्मरणीय भेट दिली असून पॅरिसमध्ये कंपनीच्या कर्मचा-यांनी सर्वात मोठी मानवी साखळी तयार करुन विक्रमही रचला आहे. 
चीनमधील ५६ वर्षीय उद्योजक ली जिनीअन यांनी १९९५ मध्ये टायन्स ग्रुप या कंपनीची स्थापना केली. ही कंपनी हॉटेल व पर्यटन, बायोटेक्नॉलॉजी, ई - कॉमर्स अशा विविध क्षेत्रात कार्यरत असून ली जिनीअन यांचा जर्गातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश होतो. ली यांच्या टायन्स समुहाला आता २० वर्ष पूर्ण झाली असून यानिमित्त ली यांनी कंपनीच्या ६, ४०० कर्मचा-यांना एक आगळी वेगळी भेट दिली. ली हे या कर्मचा-यांना थेट फ्रान्समध्ये भ्रमंतीसाठी घेऊन गेले. यासाठी ली यांनी कान्स, मॉनेको येथील ७९ थ्री व फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुमारे ४,७६० खोल्या बूक केल्या होत्या. कर्मचा-यांच्या या पॅरिस दौ-यावर ली यांनी कोट्यावधी रुपये खर्च केल्याचे समजते. मात्र ली यांच्या या भेटीने त्यांचे कर्मचारी भलतेच सुखावले.

Web Title: The owner's gift, to 6,000 employees, was made to visit France

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.