आता लक्ष्य २० हजार अब्ज डॉलरचे

By admin | Published: September 28, 2015 02:58 AM2015-09-28T02:58:25+5:302015-09-28T02:58:25+5:30

आज संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे. विश्व बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि इतर दुसऱ्या संस्था म्हणतात की, जगामधील मोठ्या देशांमध्ये भारत सर्वात अधिक गतीने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे

Now the target is 20 thousand billion dollars | आता लक्ष्य २० हजार अब्ज डॉलरचे

आता लक्ष्य २० हजार अब्ज डॉलरचे

Next

सिलिकॉन व्हॅली (अमेरिका) : आज संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे. विश्व बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि इतर दुसऱ्या संस्था म्हणतात की, जगामधील मोठ्या देशांमध्ये भारत सर्वात अधिक गतीने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. सध्या भारताची अर्थव्यवस्था आठ हजार अब्ज डॉलरची आहे आणि आम्हाला ती २० हजार अब्ज डॉलरपर्यंत वाढवायची आहे. त्याकरिता आम्हाला कृषी, सेवा आणि रियल इस्टेटच्या क्षेत्रात लक्ष देण्याची गरज आहे, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी यांनी रविवारी सोशल मीडिया फेसबुक कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी ‘लाईव्ह चॅट’ कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधला.
ते म्हणाले, एनडीए सरकारचे सर्वात मोठे यश असे की, गेल्या १५ महिन्यांमध्ये भारताकडे पाहण्याचा विश्वाचा दृष्टिकोन बदलला आहे. आम्ही गमावलेला विश्वास पुन्हा निर्माण केला आहे. प्रशासनात अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे, ज्यामुळे पारदर्शकता, उपयुक्ततता आणि सहजपणे लोकांची कामे करता आली पाहिजे. त्याकरिता निधीची कमतरता नाही, कारण की अनेक देशांकडे अतिरिक्त पैसा उपलब्ध आहे. त्यांनी या निधीची भारतात गुंतवणूक करावी, असे मोदी यांनी आवाहन केले.
मेक इन इंडियाबाबत एका प्रश्नाच्या उत्तरात पंतप्रधान म्हणाले की, भारतासारख्या विस्तीर्ण देशामध्ये परिवर्तन येण्याकरिता वेळ लागत असतो. ४० वर्षांपूर्वी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले होते. त्या माध्यमातून देशातील गरिबांना आर्थिक सोर्इंचा लाभ मिळावा, असा उद्देश होता. मात्र त्यानंतरही ६० टक्के लोकांकडे बँक खाते नव्हते. परंतु आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर १०० दिवसांमध्ये १४ कोटी लोकांची बँक खाती उघडण्यात आली. मेक इन इंडियाचे यश हे प्रत्येक व्यक्ती स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छितो. जर हे काम भारतात कमी खर्चात होत असेल तर जगातील लोक तिकडे जातील. आमच्याकडे कुशल कारागीर आणि कच्चा माल आहे. हीच मेक इन इंडियाच्या यशाची हमी आहे.
मोदी म्हणाले की, गेल्या १५ महिन्यांमध्ये भारतात अमेरिकतेतून ८७ टक्के एफडीआय वाढ झाली आहे. तसेच संस्थागत गुंतवणुकीतदेखील ४० टक्के वाढ झाली आहे. अनेक देशांमध्ये घसरण सुरू असताना भारतात ही स्थिती निर्माण झाली आहे. मेक इन इंडियाच्या यशस्वीतेकरिता आमच्याकडे तरुणांची शक्ती, सशक्त लोकशाही आणि मोठी ग्राहक संख्या आहे, अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली.
ते म्हणाले की, जेव्हा मी इंटरनेट सोशल मीडियाशी जोडल्या गेलो, त्यावेळी त्याच्या शक्तीबाबत अंदाज नव्हता. सत्तेवर आल्यानंतर सोशल मीडियामुळे कामे सहज शक्य होऊ लागली. सोशल मीडियाचे वैशिष्ट्य असे की, तुम्ही ज्या प्रकारचे आहात, त्याप्रमाणे तुमचा सोशल मीडिया स्वीकार करीत असतो. त्याकरिता तुम्हाला स्वत:मध्ये परिवर्तन घडविण्याची गरज नाही. सोशल मीडिया आजच्या घटकेला लोकशाहीचे सामर्थ्य बनला आहे. पूर्वी ज्या कामाकरिता अनेक दिवस लागत असत, ती कामे आता सेकंदामध्ये होऊ लागली आहेत.मोदी पुढे म्हणाले की, सोशल मीडियाने प्रशासनातदेखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.

Web Title: Now the target is 20 thousand billion dollars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.