आता तंत्रज्ञानसमृद्ध इस्रायल जाणार चंद्रावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 12:45 PM2018-07-12T12:45:09+5:302018-07-12T12:45:38+5:30

अमेरिकन अंतराळ उद्योजक एलन मस्कच्या स्पेसेक्स मार्फत हे पाठवल्या जाणाऱ्या रॉकेटच्या मदतीने हे यान अंतराळात पाठवले जाईल.

Now Israel to touch the moon | आता तंत्रज्ञानसमृद्ध इस्रायल जाणार चंद्रावर

आता तंत्रज्ञानसमृद्ध इस्रायल जाणार चंद्रावर

Next

जेरुसलेम- आकाराने अत्यंत लहान असूनही जगभरातील विविध देशांना तंत्रज्ञान पुरवणाऱ्या, संरक्षण क्षेत्रामध्ये मोठी प्रगती करणाऱ्या इस्रायलने आता अंतराळात नवी झेप घेण्याचे निश्चित केले आहे. येत्या डिसेंबर महिन्यामध्ये चांद्रमोहीम सुरु करत असल्याची घोषणा नुकतीच केली आहे.
या मोहिमेत इस्रायल एक मानवरहित यान चंद्रावर पाठवणार असून त्याचे वजन 585 किलो असेल. हे यान 13 फेब्रुवारी 2019 रोजी चंद्रावर पोहोचेल असे इस्रायलच्या शास्त्रज्ञांनी सांगितले.



अमेरिकन अंतराळ उद्योजक एलन मस्कच्या स्पेसेक्स मार्फत हे पाठवल्या जाणाऱ्या रॉकेटच्या मदतीने हे यान अंतराळात पाठवले जाईल. चंद्राच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यासही या मोहीमेत केला जाणार आहे.
गुगल लुनार एक्सप्राईज या मोहीमेअंतर्गत या प्रकल्पाची निवड झाली आहे. या प्रकल्पास 2.5 कोटी युरोची मदत मिळाली आहे. कमी खर्चात चांद्रमोहीमेचे आयोजन करणाऱ्या शास्त्रज्ञ व उद्योजकांना ही प्रोत्साहनपर मदत केली जाते.
इस्रायलमधील स्पेसआयएल या संस्थेने इस्रायली सरकारच्या ताब्यातील एरोस्पेस इंडस्ट्रीज या संस्थेबरोबर एकत्र काम करत चांद्रमोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Now Israel to touch the moon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.