शेपूट नसलेला धूमकेतू आढळला

By admin | Published: May 2, 2016 12:04 AM2016-05-02T00:04:36+5:302016-05-02T00:04:36+5:30

खगोलशास्त्रज्ञांना शेपटी नसलेला धूमकेतू आढळला असून, त्याद्वारे सौरमालिकेची निर्मिती आणि तिच्या विकासाचे गूढ उलगडू शकते, असे त्यांना वाटते.

Non-laser comet found | शेपूट नसलेला धूमकेतू आढळला

शेपूट नसलेला धूमकेतू आढळला

Next

केप कॅनरव्हल : खगोलशास्त्रज्ञांना शेपटी नसलेला धूमकेतू आढळला असून, त्याद्वारे सौरमालिकेची निर्मिती आणि तिच्या विकासाचे गूढ उलगडू शकते, असे त्यांना वाटते.
‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस्’ या विज्ञानविषयक नियतकालिकात या शोधाची माहिती शुक्रवारी प्रकाशित झाली. शेपूट नसलेल्या
मांजरीच्या एका प्रजातीच्या धर्तीवर या धूमकेतूचे ‘मॅन्क्स’ असे नामकरण करण्यात आले आहे.
या धूमकेतूची निर्मिती दगडी शिळेसारख्या कठीण साहित्याने
झाली आहे. असे साहित्य सामान्यपणे पृथ्वीच्या आसपास आढळून
येते. बहुतांश धूमकेतू बर्फ आणि
इतर गोठलेल्या पदार्थांनी बनलेले असतात व सौरमालिकेपासून दूर तयार होतात.
नवा धूमकेतू पृथ्वीप्रमाणे याच क्षेत्रात तयार झाला असेल आणि नंतर गुरुत्वाकर्षणामुळे जसे तारे
ढकलले जातात तसेच हाही सौरमालिकेच्या पाठीमागील भागात ढकलला गेला असेल. आणखी किती धूमकेतू आहेत याचा शास्त्रज्ञ शोध घेत आहेत. यातून सौरमालिकेने कधी आणि कशा रीतीने सध्याचा आकार ग्रहण केला हे कळू शकेल, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.
जर्मनीत युरोपियन सदर्न आॅब्जर्व्हेटरीसोबत काम करणारे खगोलशास्त्रज्ञ आणि या शोधमोहिमेत सहभागी असलेले आॅलिव्हर
हॅनॉट यांनी सांगितले की, मॅन्क्सच्या मदतीने आम्ही मोठे तारे जेव्हा लहान होते तेव्हा सौरमालिकेत कशी भ्रमंती करीत होते किंवा फारशी भ्रमंती न करताच ते वाढले याचा शोध घेऊ. (वृत्तसंस्था)

Web Title: Non-laser comet found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.