सोमालियात झाला आत्तापर्यंतचा सर्वात शक्तीशाली स्फोट; 276 लोकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 11:04 AM2017-10-16T11:04:29+5:302017-10-16T11:06:29+5:30

सोमालियाची राजधानी मोगादिशू शनिवारी सर्वात शक्तीशाली स्फोटाने हादरली.

The most powerful explosion ever happened in Somalia; 276 people died | सोमालियात झाला आत्तापर्यंतचा सर्वात शक्तीशाली स्फोट; 276 लोकांचा मृत्यू

सोमालियात झाला आत्तापर्यंतचा सर्वात शक्तीशाली स्फोट; 276 लोकांचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे सोमालियाची राजधानी मोगादिशू शनिवारी सर्वात शक्तीशाली स्फोटाने हादरली. शनिवारी एका हॉटेल आणि बाजाराच्या बाहेर झालेल्या स्फोटात 276 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 300 लोक जखमी झाली आहेत.

मोगादिशू- सोमालियाची राजधानी मोगादिशू शनिवारी सर्वात शक्तीशाली स्फोटाने हादरली. शनिवारी एका हॉटेल आणि बाजाराच्या बाहेर झालेल्या स्फोटात 276 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 300 लोक जखमी झाली आहेत. मृतांचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. गेल्या तीन दशकातील हा सर्वात शक्तीशाली स्फोट असल्याचं बोललं जातं आहे. हा स्फोट इतका भीषण होता की घटनास्थळापासून 100 ते 150 मीटरच्या परिघात उपस्थित असलेले नागरिकही मृत्युमुखी पडले. सोमालियाच्या परराष्ट्र मंत्रालयाला लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा हेतू होता. एका ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर बॉम्बसाठा ठेवून तो एका गजबजलेल्या रस्त्यावर सोडण्यात आला. 

सोमालियाचे नेते अब्दीरहमान उस्मान यांनी या घटनेला अतिभयंकर असं म्हंटलं आहे. तुर्की आणि केनियासह अनेक देशातून जखमींवर उपचारासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. परराष्ट्र मंत्रालयासह महत्त्वपूर्ण मंत्रालयाच्या जवळील रस्त्यांवर निशाणा साधत हा ट्रक बॉम्ब स्फोट झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी झाली होती.

स्फोट झालेल्या ठिकाणी संतप्त नागरिकांनी गर्दी केली होती. तर सोमालिया सरकारने या स्फोटाला राष्ट्रीय संकट जाहीर केलं आहे. अल-कायदाशी संबंधीत समूह अल-शबाबला या स्फोटासाठी सरकाने जबाबदार ठरवलं आहे. आफ्रिकेतील या घातक समूहाने याआधी अनेक वेळा राजधानी मोगादिशूमधील महत्त्वाच्या ठिकाणांवर निशाणा साधला होता. पण आत्तापर्यंत या स्फोटाबाबतील या समूहाने कुठलीही माहिती दिलेली नाही.

सोमालियाक तीन दिवसाचा दुखवटा जाहीर
सोमालियाचे राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल्लाही मोहम्मद यांनी तीन दिवसाच्या दुखवट्याची घोषणा केली आहे. तसंच रक्तदान करून पीडितांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. शहरात झालेल्या या स्फोटामुळे इमारतीच्या खाली दबलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. 

हॉस्पिटलमध्ये जखमींची वाढती संख्या
या स्फोटातून बचावलेल्या मोहम्मद अब्शीर यांनी सांगितलं, या हल्ल्यात माझ्या तीन भावांचा मृत्यू झाला. जेव्हा हा स्फोट झाला तेव्हा आम्ही आमच्या मेडिकलमध्ये होते. राजधानीतील प्रत्येक हॉस्पिटल जखमी आणि मृत्यू झालेल्या लोकांनी भरलं आहे, अशी माहिती एका डॉक्टरांनी दिली आहे. 

कुठल्याही संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्विकारली नाही
सोमालियात झालेल्या या भीषण हल्ल्याची अजून कुठल्याही संघटनेनं जबाबदारी स्विकारली नाही. पण अल-शबाब या दहशतवादी संघटनेचा या हल्ल्यामागे हात असावा असे संकेत मिळत आहेत. अल-शबाब या संघटनेचा अल-कायदाशी संबंध आहे. 

सोमालिया सरकारचा दावा
सोमालिया सरकारने अल-शबाबला या हल्ल्यासाठी जबाबदार धरलं आहे. पण अल-शबाबने आत्तापर्यंत यावर काहीही उत्तर दिलेलं नाही. 
 

Web Title: The most powerful explosion ever happened in Somalia; 276 people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Blastस्फोट